पाण्यात भिजवलेल्या चिया सीड्सचं रिकामी पोटी करा सेवन, शरीरात दिसतील आश्चर्यकारक फायदे
- Published by:Pooja Pawar
- trending desk
Last Updated:
अनेक लोक चिया सीड्सचा आहारात समावेश करत आहेत. लहान लहान चिया सीड्समध्ये अँटिऑक्सिडंट, खनिजं, फायबर व ओमेगा -3 फॅटी ॲसिड आढळतात.
चिया सीड्स सुपरफूड म्हणून ओळखले जाते. वजन कमी करण्यासाठी या बियांचा खूप फायदा होतो, असं म्हटलं जातं. त्यामुळे आजकाल अनेक लोक चिया सीड्सचा आहारात समावेश करत आहेत. लहान लहान चिया सीड्समध्ये अँटिऑक्सिडंट, खनिजं, फायबर व ओमेगा -3 फॅटी ॲसिड आढळतात. रोज सकाळी रिकाम्यापोटी चिया सीड्सचं पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तसेच या बियांच्या सेवनाने पचनक्रिया सुधारण्यासही मदत होते. चिया सीड्स भिजवल्यानंतर त्या जेलसारख्या होतात, त्यामुळे त्या पोटात गेल्यावर खूप लाभदायी ठरतात. चिया सीड्सचे फायदे जाणून घ्या.
चिया सीड्समध्ये भरपूर प्रथिने असतात, ज्यामुळे स्नायू मजबूत तयार होण्यास मदत होते. यात भरपूर फायबर आणि प्रथिने असतात, त्यामुळे आपले पोट जास्त काळ भरलेले राहण्यास मदत होते आणि वारंवार भूक लागत नाही. चिया सीड्स पोषणाचे पॉवरहाउस मानले जाते. रात्री पाण्यात भिजवून ठेवलेल्या चिया सीड्सचे सकाळी रिकाम्यापोटी सेवन केल्याने शरीराला कोणते सहा फायदे मिळतात ते पाहा.
advertisement
चिया सीड्सचं पाणी पिण्याचे फायदे :
1. पचनक्रिया सुधारते : चिया सीड्समध्ये फायबरचे प्रमाण खूपच जास्त असते, ते पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. तुम्ही रिकाम्यापोटी चिया सीड्सचे पाणी पिऊ शकता.
2. लठ्ठपणा : सकाळी रिकाम्यापोटी चिया सीड्सचे पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होते. कारण यामध्ये खूप कमी कॅलरीज असतात.
advertisement
3. ब्लड शुगर : चिया सीड्समधील फायबर ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत करतात. डायबेटिसच्या रुग्णांसाठी चिया सीड्सचे पाणीच खूप फायद्याचे ठरते.
4. हृदय : चिया सीड्समध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड व अँटिऑक्सिडंट्स असतात जे हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
5. त्वचा : चिया सीड्सचं पाणी पिणं त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे, कारण चिया सीड्समध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स व मिनरल्स असतात.
advertisement
6. एनर्जी : चिया सीड्समध्ये प्रोटीन व ओमेगा-3 फॅटी ॲसिड असतं जे एनर्जी वाढवण्याचं काम करते. त्यामुळे चिया सीड्सचे सेवन करणं फायद्याचं ठरतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 30, 2024 9:07 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
पाण्यात भिजवलेल्या चिया सीड्सचं रिकामी पोटी करा सेवन, शरीरात दिसतील आश्चर्यकारक फायदे