शिसवी लाकूड अन् सागवानाच्या घर सजावटीसाठी आकर्षक वस्तू, 10 रुपयांत करा इथं खरेदी Video
- Published by:News18 Marathi
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
घराचं सौंदर्य आणखी सुबक आणि वैभवपूर्ण करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला पुण्यातील एका मार्केटबद्दल सांगणार आहोत. जिथून तुम्ही घर सजावटीसाठी स्वस्तात वस्तू खरेदी करू शकतात.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : प्रत्येक जणांला आपलं घर हे सुंदर आणि सुबक ठेवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या सजावटीच्या इंटिरियर गोष्टींची गरज भासते. त्यामुळे हल्ली आपल्या घराचं सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक जण ऑनलाईन शॉपिंगद्वारे वस्तू खरेदी करताना पाहायला मिळतात. मात्र घराचं सौंदर्य आणखी सुबक आणि वैभवपूर्ण करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला पुण्यातील एका मार्केटबद्दल सांगणार आहोत. जिथून तुम्ही घर सजावटीसाठी स्वस्तात वस्तू खरेदी करू शकतात.
advertisement
कुठे कराल वस्तूंची खरेदी?
पुण्यातील शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या तुळशीबाग मार्केट इथे लाला हुडण हँन्डी क्राफ्ट या दुकानात शिसवी लाकूड आणि सागवानपासून बनवल्याला अप्रतिम, आकर्षक आणि टीकायला ही जास्त काळ अश्या वस्तू मिळतं आहेत. या वस्तू तुम्ही 10 रुपयांपासून खरेदी करू शकतात. यामध्ये वेगवेगळे प्रकार या ठिकाणी मिळतील.
advertisement
कोण कोणते आहेत प्रकार?
लाला हुडण हँन्डी क्राफ्ट या दुकानात शिसवी आणि सागवान लाकडापासून बनवलेल्या वस्तू आहेत. प्रामुख्याने यूपीमध्ये या सर्व वस्तू बनवल्या जातात. घरात लावायचं घड्याळ, झुला, तोफ, पक्षी सेट, पॉट, बैलगाडी, मेटलची गाडी, पाट, छोटी कॉट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू इथे आहेत. याची किंमत ही 10 रुपयांपासून सुरु होते, अशी माहिती व्यवसायिक लाला सरोज यांनी दिली आहे.
advertisement
वस्तूंमुळे घराची शोभा दिसेल खुलून
view commentsया वस्तू तुम्ही तुमच्या जवळच्या नातेवाईक मंडळींना देखील भेट देऊ शकता. या वस्तूंमुळे तुमच्या घराची शोभा खुलून दिसेल. या वस्तू किती ही वर्ष तुम्ही वापरू शकता. त्यामुळे जर कोणाला भेट द्यायची असेल किंवा सजावटीसाठी हवं असेल तर नक्कीच या मार्केट ला भेट देऊ शकता, असंही व्यवसायिक लाला सरोज यांनी सांगितलं.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
May 29, 2024 12:16 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
शिसवी लाकूड अन् सागवानाच्या घर सजावटीसाठी आकर्षक वस्तू, 10 रुपयांत करा इथं खरेदी Video

