आता पिवळ्या दातांची चिंता विसरुन जा, 'या' घरगुती उपायांनी चमकवा मोत्यांसारखे दात
- Published by:Devika Shinde
- trending desk
Last Updated:
दररोज दात घासल्यानंतरही अनेकांचे दात पिवळे असतात. दात पिवळे असतील तर ते लाजिरवाणंही होतं. निरोगी दात आणि हिरड्या हे निरोगी आयुष्याचं लक्षण आहे.
मुंबई : आपण दररोज आपल्या शरीराची स्वच्छता करतो. त्यामध्ये दात घासण्याच्या क्रियेचाही समावेश आहे. दररोज दात घासल्यानंतरही अनेकांचे दात पिवळे असतात. दात पिवळे असतील तर ते लाजिरवाणंही होतं. निरोगी दात आणि हिरड्या हे निरोगी आयुष्याचं लक्षण आहे. दात आणि हिरड्या कमकुवत असतील तर आपल्याला जेवताना त्रास होतो. त्यामुळे शरीराला अन्नातून योग्य प्रमाणात पोषकतत्त्वं मिळू शकत नाहीत. जेव्हा आपल्या शरीरात एखाद्या पोषक घटकाची कमतरता असते तेव्हाच बॅक्टेरिया दातांवर हल्ला करतात. त्यामुळे दात किडणं, दुखणं, सूज येणं, पिवळेपणा यांसारख्या गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागतं. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी काही विशिष्ट पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे.
फुलकोबी : ज्या भाज्या खूप चावून खाव्या लागतात, अशा भाज्यांमध्ये फुलकोबीचा समावेश होतो. ही भाजी दातांसाठी चांगली मानली जाते. अन्न चावायला आणि पचायला जितका जास्त वेळ लागतो तितकी जास्त लाळ तयार होते. दात चमकदार ठेवण्यासाठी लाळ नैसर्गिक क्लीन्झर म्हणून कार्य करते.
स्ट्रॉबेरी : गडद रंगाच्या या फळामध्ये मॅलिक ॲसिड नावाचं एन्झाइम मुबलक प्रमाणात असतं. हा घटक आपले दात नैसर्गिकरीत्या पांढरे करतो.
advertisement
पनीर : पनीर, दही आणि दुधासारख्या डेअरी प्रॉडक्ट्समध्ये लॅक्टिक ॲसिड आणि इनॅमल मजबूत करणारे मिनरल्स आणि कॅल्शियम असतं. यामुळे आपले दात मजबूत आणि पांढरे होतात. पनीर चावल्याने जास्त लाळ निर्माण होते. त्यामुळे दातांवर चिकटलेले अन्नाचे कण निघून जातात.
सफरचंद : हे फळ खाण्यासाठी ते जास्त वेळ चावावं लागते. त्यामुळे तोंडाचा व्यायाम आणि स्वच्छता दोन्ही होतं. सफरचंदामुळे होणाऱ्या नैसर्गिक स्क्रबिंग प्रक्रियेमुळे दातांवरचा पिवळा थर निघून जातो.
advertisement
ओवा : तंतुमय फळं आणि भाज्यांमध्ये कमी कॅलरी आणि पोषक तत्त्वं जास्त असतातच. अशा भाज्या आणि फळं खाल्ल्याने दात पांढरे आणि हिरड्या निरोगी राहतात. भाजी किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी उपयुक्त असलेली ओवा ही अशाच प्रकारची वनस्पती आहे.
सध्याच्या काळात आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी फार बदलल्या आहेत. त्यामुळे आपल्या आरोग्यासोबत दातांचीही हानी होत आहे. ती टाळण्यासाठी या भाज्या आणि फळं उपयुक्त ठरू शकतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 08, 2024 10:11 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
आता पिवळ्या दातांची चिंता विसरुन जा, 'या' घरगुती उपायांनी चमकवा मोत्यांसारखे दात