अनेक आजार मुळापासून उखडते ही वनस्पती, यकृतावर रामबाण!

Last Updated:

आयुर्वेदात या वनस्पतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यात अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात.

शरिरातील गाठींवरसुद्धा ती रामबाण असते.
शरिरातील गाठींवरसुद्धा ती रामबाण असते.
आशिष कुमार, प्रतिनिधी
पश्चिम चम्पारण : हळद हा आपल्या स्वयंपाकघरातला एक महत्त्वाचा पदार्थ. हळदीचे विविध गुणधर्म आपल्याला माहित असतील. परंतु आपण कधी जंगली हळदीबाबत ऐकलंय का? 'वन हळद' नावाने ओळखल्या जाणाऱ्या या हळदीचे गुणकारी फायदे आपण जाणून घेऊया.
आयुर्वेदात वन हळदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शरीर ऊर्जावान राहणं, गॅसची समस्या दूर होणं, त्वचा तजेलदार राहणं, पचनसंस्था सुरळीत होणं, मासिकपाळी सुरळीत येणं, पित्ताचा त्रास दूर होणं, इत्यादी विविध फायदे वन हळदीमुळे होतात.
advertisement
वन हळदीत अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. परिणामी या हळदीमुळे खोकला, घश्याची खवखव त्वरित बरी होते. चिमूटभर हळद मिसळलेलं कोमट पाणी दिवसातून दोनवेळा पिण्याचा सल्ला दिला जातो. त्याचबरोबर शरिरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासही वन हळद उपयुक्त ठरते. त्यामुळे मधुमेहावर ती गुणकारी मानली जाते.
advertisement
कार्बन टेट्राक्लोराइडपासून यकृताच्या होणाऱ्या नुकसानात वन हळद फायदेशीर ठरते. किडनी, हृदय आणि मेंदूचं आरोग्यदेखील ही हळद सुदृढ ठेवते. शरिरात झालेल्या गाठींवरसुद्धा ती रामबाण असते. चहामध्ये मिसळून या हळदीचं सेवन केलं जाऊ शकतं. त्याचबरोबर लेप बनवूनही ती त्वचेवर लावता येते. महत्त्वाचं म्हणजे त्वचा उजळण्यास त्वचेवरील तेलकटपणा नष्ट करण्यास, काही प्रमाणात सुरकुत्या कमी करण्यासही वन हळद फायदेशीर असते. परंतु ही हळदच नाही, तर कोणत्याही पदार्थाचा औषध म्हणून वापर करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
advertisement
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
अनेक आजार मुळापासून उखडते ही वनस्पती, यकृतावर रामबाण!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement