वर्षाअखेर या देशात सुट्टी एन्जाॅय करा, इथे जाण्यासाठी ना फ्लाइटच्या तिकिटांची गरज, ना व्हिसाची!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
क्रिसमस-न्यू इयरच्या सुट्ट्यांमध्ये थिम्पूला भेट देण्याची ही उत्तम संधी आहे. व्हिसाशिवाय, किफायतशीर खर्चात रस्त्याने तुम्ही भूतानच्या या सुंदर राजधानीला पोहोचू शकता. भारतीय चलनाचा स्वीकार आणि तुमचे वाहन वापरण्याची परवानगी येथे आहे. बुद्ध पॉइंट आणि थंड हवेचा आनंद घ्या.
जर तुमची परदेशी सुट्टीची इच्छा पूर्ण झालेली नसेल, तर या क्रिसमस किंवा न्यू इयरच्या सुट्ट्या तुमच्यासाठी उत्तम संधी आहेत. तुम्हाला ना महागड्या फ्लाइट तिकिटांची गरज आहे, ना व्हिसाचा त्रास. तुम्ही रस्त्याने सहज भूतानमधील सुंदर थिम्पू शहराला भेट देऊ शकता.
थिम्पू हे भूतानची राजधानी असून देशातील सर्वात मोठे शहर आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 8688 फूट उंचीवर वसलेले हे शहर जागतिक पातळीवर 6 सर्वाधिक उंच राजधानींमध्ये गणले जाते. येथे सध्या तापमान 14 अंश सेल्सियसपासून -7 अंश सेल्सियसपर्यंत आहे.
थिम्पूला पोहोचण्यासाठी प्रथम तुम्हाला ट्रेन किंवा कारने सिलिगुरी गाठावे लागेल. येथे एका दिवसाची विश्रांती घेऊन स्थानिक बाजार, स्ट्रीट फूड आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घ्या. नंतर, भारत-भूतान सीमेवरील फुंटशोलिंग येथे पोहोचावे लागेल. येथे इमिग्रेशन प्रक्रियेनंतर तुम्ही भूतानमध्ये प्रवेश करू शकता.
advertisement
थिम्पू शहराची सफर सुरू करण्यासाठी कुन्सेल फोडरंग येथे बुद्ध पॉइंट हा सर्वोत्तम पर्याय आहे. येथून तुम्हाला संपूर्ण शहराचा विहंगम नजारा पाहायला मिळतो. भूतानमधील चलन भारताच्या रुपयाइतकेच मूल्यवान आहे. म्हणजेच 1 भारतीय रुपया = 1 भूतानी न्गुलट्रम. भारतीय चलन इथे सहज स्वीकारले जाते. तसेच, तुमचे स्वतःचे वाहन घेऊन जाण्याची परवानगी मिळू शकते. वाहनासोबत आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा. 10 वर्षांपेक्षा जुनी वाहने भूतानमध्ये प्रवेश करू शकत नाहीत.
advertisement
हे ही वाचा : Pearl Farming : नुसता पैसाच पैसा, एका मोत्याला मिळतो हजारोंचा भाव,अशी करा मोत्याची शेती
हे ही वाचा : Astrology : नव्या वर्षात 4 राशींच्या व्यक्ती घेणार नवी गाडी अन् नवं घर, शुक्राची विशेष होणार कृपा
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 19, 2024 11:04 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Travel/
वर्षाअखेर या देशात सुट्टी एन्जाॅय करा, इथे जाण्यासाठी ना फ्लाइटच्या तिकिटांची गरज, ना व्हिसाची!