IRCTC चं स्पेशल पॅकेज, भारत गौरव ट्रेनने करा 7 ज्योतिर्लिंगाची यात्रा, EMI चीही सुविधा

Last Updated:

या पॅकेजमध्ये ओंकारेश्वर, महाकालेश्वर, नागेश्वर, सोमनाथ, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर आणि घृष्णेश्वरचे दर्शन लोकांना होतील. यासोबतच द्वारकाधीश मंदिराचाही यामध्ये समावेश आहे.

भारत गौरव ट्रेन
भारत गौरव ट्रेन
अभिषेक जैस्वाल, प्रतिनिधी
वाराणसी : सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत. त्यामुळे अनेक जण फिरायला गेले असतील. तुम्हीही जर ट्रिपचा प्लान तयार करत असाल तर IRCTC ने प्रवाशांसाठी एक चांगले पॅकेज आणले आहे. भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून तुम्हाला आता 7 ज्योतिर्लिंगांचे दर्शन करण्याचा योग येऊ शकतो. विशेष म्हणजे यासाठी ईएमआयचीही सुविधा उपलब्ध आहे.
या पॅकेजमध्ये ओंकारेश्वर, महाकालेश्वर, नागेश्वर, सोमनाथ, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर आणि घृष्णेश्वरचे दर्शन लोकांना होतील. यासोबतच द्वारकाधीश मंदिराचाही यामध्ये समावेश आहे. ही ट्रेन 26 जून ते 8 जुलैपर्यंत चालेल. IRCTC ने याबाबत माहिती दिली.
advertisement
'...तर सोशल मीडियापासून दूर राहा'; NEET मध्ये देशात पहिला क्रमांक मिळवलेल्या तरुणीचा विद्यार्थ्यांना सल्ला
IRCTC ने दिलेल्या माहितीनुसार, 13 दिवस आणि 12 रात्रीचा या टूर पॅकेजची किंमत 24 हजार 300 रुपये आहे. याशिवाय थर्ड एसी आणि सेकंड एसीचे पॅकेज वेगळे आहेत. थर्ड एसीमध्ये तुम्हाला 40 हजार 600 रुपये तर सेकंड एसीसाठी तुम्हाला 53 हजार 800 रुपये खर्च करावे लागतील. या पॅकेजमद्ये दुपारी आणि रात्रीच्या जेवणासह एसी आणि नॉन एसी बसच्या भाड्याचा समावेश आहे.
advertisement
ईएमआय किती -
IRCTC चे मुख्य प्रादेशिक व्यवस्थापक अजीत कुमार सिन्हा यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, या पॅकेजसाठी ईएमआय सुविधाही उपलब्ध आहे. लोक दरमहा 1178 रुपयांच्या ईएमआयवर ते बुक करू शकतात. यासाठी तुम्हाला IRCTC वेबसाइटवर जावे लागेल. सरकारी आणि गैर-सरकारी दोन्ही बँकांमधून ईएमआय सुविधा उपलब्ध आहे.
advertisement
याठिकाणी करता येणार बुकिंग -
या विशेष ट्रेनमध्ये तुम्ही गोरखपूर, कप्तान गंज, शिवन, बनारस, प्रयागराज, लखनौ, कानपूर, ओराई आणि झाशी येथून चढू शकता. IRCTC च्या www.irctctourism.com या अधिकृत वेबसाइटवर तुम्ही याची बुकींग करू शकता.
मराठी बातम्या/Travel/
IRCTC चं स्पेशल पॅकेज, भारत गौरव ट्रेनने करा 7 ज्योतिर्लिंगाची यात्रा, EMI चीही सुविधा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement