Flower Festival: छत्रपती संभाजी उद्यान बहरलं, पुण्यात फूल महोत्सव, यंदा काय आहे खास?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Pune Flower Festival: पुणेकरांना रंगीबेरंगी फुलांचा अप्रतिम नजारा पाहण्याची संधी आहे. पुणे महापालिकेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त फूल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे – देश-विदेशातील विविध प्रकारच्या दुर्मीळ फुलांच्या प्रजाती एकाच ठिकाणी पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी उद्यानात भव्य पुष्पप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे भव्य पुष्पप्रदर्शन दोन दिवस चालणार असून पुणेकरांसाठी ते खुले आहे. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
या प्रदर्शनात देशातील तसेच परदेशातील रंगीबेरंगी आणि दुर्मीळ फुलझाडांची खास झलक पाहायला मिळणार आहे. निसर्गप्रेमी, फुलशेती करणारे उद्योजक आणि वनस्पतीशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन एक पर्वणीच ठरणार आहे. या प्रदर्शनात फुलांच्या अनोख्या जाती, त्यांची माहिती आणि त्यांचे सौंदर्य एकाच ठिकाणी पाहायला मिळणार असल्याने नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
advertisement
फूल प्रदर्शनात निसर्गावर आधारित वेगवेगळ्या देखावे केले जातात. मयुरवन, शेतकरी राजा, चंद्रयान, मिशन मंगल, मनपा इमारत देखावा तयार करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना झाड, वृक्ष उद्यान या बाबत जनजागृती व्हावी यासाठी हे प्रदर्शन भरवलं जातं.
advertisement
पुणे महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेले हे पुष्पप्रदर्शन पुणेकरांसाठी एक खास आकर्षण ठरत आहे. त्यामुळे 15 आणि 16 फेब्रुवारी रोजी निसर्गप्रेमी आणि रसिक नागरिकांनी या अनोख्या पुष्पसंग्रहाचा आनंद घ्यावा, अशी माहिती उद्यान अधीक्षक प्रीती प्रसाद यांनी दिली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
February 16, 2025 11:13 AM IST
मराठी बातम्या/Travel/
Flower Festival: छत्रपती संभाजी उद्यान बहरलं, पुण्यात फूल महोत्सव, यंदा काय आहे खास?