Shivmohim: पाऊस अन् कोसळणारे धबधबे, पन्हाळा ते पावनखिंड पायी शिवमोहीम केली पूर्ण, सांगितला थरारक अनुभव, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
छत्रपती शिवरायांच्या विचारांचे वेड असलेला जालन्यातील मावळ्याने आत्तापर्यंत अनेक शिवमोहीम यशस्वी केल्यात.
जालना: आपल्यापैकी अनेकांना वेगवेगळ्या गोष्टींचे वेड असतं. कुणाला राजकारणाचे, कुणाला क्रिकेटचं तर कुणाला अन्य गोष्टींचं वेड असतं. परंतु छत्रपती शिवरायांच्या विचारांचे वेड असलेला जालन्यातील मावळ्याने आत्तापर्यंत अनेक शिवमोहीम यशस्वी केल्यात. जालन्यातील मांडवा येथील रहिवासी असलेले आणि ठाणे येथे पोलीस दलात कार्यरत असलेले रामेश्वर चंद यांनी नुकतीच पन्हाळा ते पावनखिंड अशी 53 किलोमीटर अंतराची पायी शिवमोहीम आपल्या 18 सहकाऱ्यांसह पूर्ण केली. मोहिमेदरम्यान त्यांना कोणकोणते थरारक अनुभव आले? याबाबत लोकल 18 ने त्यांच्याकडून जाणून घेतलं पाहुयात.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, मासाहेब जिजाऊ यांच्या विचारांचे वेड मला लहानपणापासूनच आहे. माझ्या नऊ वर्षांच्या मुलाने आत्तापर्यंत 50 पेक्षा अधिक किल्ले सर केलेत. कुटुंबासह देखील आम्ही बऱ्याचदा गडकिल्ले आणि ऐतिहासिक ठिकाणी जात असतो. नुकतीच आम्ही 53 किमींची पन्हाळा ते पावनखिंड अशी साहसी मोहीम पूर्ण केली, असं रामेश्वर चंद यांनी सांगितलं.
advertisement
या मोहिमेदरम्यान ऊन, वारा, पाऊस, चिखलाने भरलेला रस्ता, कोसळणारे धबधबे, असंख्य अडचणी असतानाही केवळ छत्रपती शिवरायांचा जयघोष आणि त्यातून निर्माण होणारी ऊर्जा या प्रेरणेत आम्ही ही शिवमोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुस्तकातून वाचण्याबरोबरच ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन अनुभवणे गरजेचं आहे. शिवाजी महाराज इथे बसले असतील, त्यांचे मावळ्यांनी इथे जेवण केलं असेल, इथे ती लढाई लढले असतील असं प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणं आणि अनुभवणं हे फार आनंददायी असते. त्यामुळे आम्ही या मोहिमेतून आयोजन केलं.
advertisement
53 किमीच्या दरम्यान आंबेवाडी येथे एक मुक्काम केला. संपूर्ण प्रवासात कुठेही काहीही अडचण आली नाही. प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, दुर्दम्य साहस, इच्छाशक्ती आणि स्वराज्य जाणून घ्यायचं असेल तर अशा पद्धतीच्या शिवमोहिमांवर अवश्य जावं, असं आवाहन रामेश्वर चंद यांनी शिवप्रेमींना केलं आहे.
view commentsLocation :
Jalna,Jalna,Maharashtra
First Published :
August 01, 2025 4:51 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Travel/
Shivmohim: पाऊस अन् कोसळणारे धबधबे, पन्हाळा ते पावनखिंड पायी शिवमोहीम केली पूर्ण, सांगितला थरारक अनुभव, Video

