Diwali 2025 : या दिवाळीत दुखापतींपासून राहायचंय दूर, बर्न इंजरीपासून वाचण्यासाठी फॉलो करा सोप्या टिप्स!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
दिवाळी म्हणजे दिव्यांचा आणि आनंदाचा सण. परंतु, फटाके, दिवे आणि गरम तेलामुळे या काळात भाजण्याच्या घटनांमध्ये वाढ होते. उत्सव साजरा करताना आपला आणि आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात येऊ नये म्हणून विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
Diwali Safety Tips : दिवाळी म्हणजे दिव्यांचा आणि आनंदाचा सण. परंतु, फटाके, दिवे आणि गरम तेलामुळे या काळात भाजण्याच्या घटनांमध्ये वाढ होते. उत्सव साजरा करताना आपला आणि आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात येऊ नये म्हणून विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. थोडीशी सतर्कता आणि योग्य उपाययोजना केल्यास आपण या अपघातांपासून स्वतःला वाचवू शकतो आणि दिवाळीचा आनंद सुरक्षितपणे लुटू शकतो.
योग्य कपड्यांची निवड: फटाके फोडताना किंवा दिवे लावताना सुती कपडे घाला. नायलॉन, सिल्क किंवा सिंथेटिक कपडे सहजपणे आग पकडतात आणि जळाल्यास त्वचेला चिकटून जखम अधिक गंभीर करू शकतात.
सुरक्षित अंतर राखा: दिवे आणि मेणबत्त्या नेहमी पडदे, कागदी सजावट किंवा इतर ज्वलनशील वस्तूंपासून दूर ठेवा. फटाके नेहमी मोकळ्या जागेत आणि सुरक्षित अंतरावर फोडा.
advertisement
पाणी आणि वाळू जवळ ठेवा: फटाके फोडण्याच्या ठिकाणी पाण्याची बादली आणि वाळूची बादली नेहमी तयार ठेवा. अचानक आग लागल्यास त्वरित उपाय करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
मुलांवर लक्ष ठेवा: मुलांना एकट्याने फटाके फोडू देऊ नका. फुलझडी किंवा अनार यांसारखे लहान फटाके फोडतानाही प्रौढांचे लक्ष असणे आवश्यक आहे, कारण फुलझडीचे तापमान खूप जास्त असते.
advertisement
न वाजलेला फटाका पुन्हा पेटवू नका: जर एखादा फटाका पहिल्यांदा पेटवल्यानंतर वाजला नाही, तर त्याला पुन्हा हात लावू नका. त्यावर पाणी टाकून तो निकामी करा आणि सुरक्षितपणे फेकून द्या.
भाजल्यास त्वरित प्रथमोपचार
जखमेवर लगेच थंड, वाहते पाणी 10 ते 15 मिनिटांपर्यंत सोडा.
भाजलेल्या जागी बर्फ, टूथपेस्ट, लोणी किंवा इतर घरगुती उपाय अजिबात वापरू नका.
advertisement
जखम मोठी असल्यास किंवा चेहरा, हात, पाय यांसारख्या नाजूक भागावर भाजल्यास लगेच डॉक्टर किंवा जवळच्या रुग्णालयात जा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 20, 2025 1:09 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diwali 2025 : या दिवाळीत दुखापतींपासून राहायचंय दूर, बर्न इंजरीपासून वाचण्यासाठी फॉलो करा सोप्या टिप्स!