Kitchen Tips : प्रेशर कुकरमध्ये डाळ शिजवताना वापरा 'ही' ट्रिक; अजिबात बाहेर येणार डाळ
Last Updated:
Kitchen Tips In Marathi : कुकरमध्ये कमी वेळात डाळ व्यवस्थित शिजते. यामुळे गॅसचीही बचत होते. शिवाय, प्रेशर कुकरमध्ये डाळ शिजवल्यामुळे जास्त पोषक तत्वे आणि चव टिकून राहतात. असे काही लोकांचे मत आहे.
मुंबई : प्रेशर कुकरमध्ये डाळ शिजवणे हल्ली खूप फायदेशीर झाले आहे. यामुळे शिजवण्याचा वेळ खूप कमी होतो. कामाच्या धावपळीत पौष्टिक आणि स्वादिष्ट जेवण बनवणे शक्य होते. कुकरमध्ये कमी वेळात डाळ व्यवस्थित शिजते. यामुळे गॅसचीही बचत होते. शिवाय, प्रेशर कुकरमध्ये डाळ शिजवल्यामुळे जास्त पोषक तत्वे आणि चव टिकून राहतात. असे काही लोकांचे मत आहे.
डाळ शिजवताना योग्य पद्धत वापरणं गरजेचं असतं. अन्यथा डाळ व्यवस्थित शिजवत नाही किंवा ती कुकरबाहेर येते. प्रेशर कुकरमध्ये डाळ शिजवताना ती वारंवार बाहेर आल्यामुळे घाण होते, अन्न वाया जाते आणि कुकरलाही नुकसान पोहोचते. पण काही सोपे घरगुती उपाय करून ही समस्या सहज टाळू शकता. चला पाहुयात डाळ शिजवताना वापरायच्या सोप्या ट्रिक्स.
advertisement
प्रेशर कुकरमध्ये डाळ शिजवताना वापरा या ट्रिक्स
- डाळ शिजवण्यापूर्वी किमान 30 मिनिटं ते 1 तास पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे डाळीच्या पृष्ठभागावरील स्टार्च आणि घाण निघून जाते. हे केल्यामुळे डाळीवर फेस कमी येतो.
- कुकरमध्ये टाकण्यापूर्वी डाळ 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवा. पाणी पूर्णपणे स्वच्छ दिसल्यावरच डाळ कुकरमध्ये घाला. यामुळे अशुद्धता आणि फेस तयार करणारा स्टार्च निघतो.
advertisement
- डाळ कुकरमध्ये घालताना त्यात 1 चमचा तेल किंवा देशी तूप टाका. यामुळे डाळ उकळताना फेस तयार होत नाही आणि ती कुकरच्या बाहेर येत नाही.
- डाळ शिजवताना त्यामध्ये थोडी हळद घातल्यासही डाळ कुकरच्या बाहेर येत नाही. त्याचबरोबर डाळीला चवही अगदी छान येते.
- डाळ शिजवताना कधीही कुकर पाण्याने पूर्णपणे भरू नये. फक्त अर्धा भागच पाणी घालावे. जेणेकरून डाळ उकळताना फसफसण्यास जागा मिळेल आणि डाळ शिट्टीच्या मार्गाने बाहेर येणार नाही.
advertisement
- पहिली शिटी लागल्यानंतर गॅसची आच मंद करा. यामुळे डाळ हळूहळू उकळेल आणि फेस तयार होण्याची प्रक्रिया थांबेल.
डाळ शिजवण्यासाठी कुकर उत्तम पर्याय आहे. त्याची वेळोवेळी योग्य काळजी घेणंही अवश्य आहे. त्यामुळे वेळोवेळी कुकरची शिट्टी आणि रिंग म्हणजेच व्हेन्ट ट्यूब स्वच्छ करत राहा. तसेच हे छोटे छोटे उपाय लक्षात ठेवा. या उपायांनी निश्चितच तुमची डाळ स्वच्छ, नीट शिजेल आणि प्रेशर कुकरला कोणतेही नुकसान होणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 23, 2025 3:41 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : प्रेशर कुकरमध्ये डाळ शिजवताना वापरा 'ही' ट्रिक; अजिबात बाहेर येणार डाळ