Blood Group : A+ ब्लड ग्रुप व्यक्तीला आणि B+ ग्रुपचं रक्त दिलं तर काय होईल? यामुळे मृत्यू होतो का?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कधी विचार केलात का जर समजा चुकून एखाद्या A+ ब्लड ग्रुपच्या व्यक्तीला चुकून B+ रक्त चढवलं गेलं, तर काय होईल? त्या व्यक्तीचा जीव धोक्यात येईल का? चला, हे वैज्ञानिकदृष्ट्या समजून घेऊया.
मुंबई : आपल्या शरीरात रक्त म्हणजे शरीरातील खूप महत्वाची गोष्ट आहे. शरीरात ऑक्सिजन पोहोचवणं, अवयवांना ऊर्जा देणं आणि रोगांपासून संरक्षण करणं, या सगळ्या गोष्टी रक्तामुळेच शक्य होतात. पण हे रक्त सगळ्यांसाठी सारखं नसतं. प्रत्येक व्यक्तीचा ब्लड ग्रुप (Blood Group) वेगळा असतो. काही लोकांचं रक्त सगळ्यांना दिलं जाऊ शकतं, तर काहींचं रक्त फक्त ठराविक गटांनाच लागू शकतं. पण कधी विचार केलात का जर समजा चुकून एखाद्या A+ ब्लड ग्रुपच्या व्यक्तीला चुकून B+ रक्त चढवलं गेलं, तर काय होईल? त्या व्यक्तीचा जीव धोक्यात येईल का? चला, हे वैज्ञानिकदृष्ट्या समजून घेऊया.
ब्लड ग्रुप ठरतो कशावरून?
प्रत्येक व्यक्तीच्या रक्तात काही खास एंटीजन (Antigens) आणि एंटीबॉडीज (Antibodies) असतात. यावरूनच ब्लड ग्रुप ठरतो. A+ ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तींच्या रक्तात A एंटीजन आणि Anti-B antibodies असतात. तर B+ ब्लड ग्रुप मध्ये B एंटीजन आणि Anti-A antibodies असतात.
मग अशा परिस्थीतीत जर चुकीचं रक्त चढवलं तर काय होतं?
जर एखाद्या A+ व्यक्तीला B+ रक्त चढवलं गेलं, तर त्याच्या रक्तातील Anti-B antibodies, B+ रक्तातील B एंटीजनवर हल्ला करतात. त्यामुळे रेड ब्लड सेल्स भांडतात आणि फाटतात. ही प्रतिक्रिया अतिशय धोकादायक ठरू शकते. या प्रक्रियेला वैद्यकीय भाषेत Acute Hemolytic Transfusion Reaction (AHTR) म्हणतात.
advertisement
ही अवस्था काही मिनिटांतच गंभीर रूप धारण करू शकते. त्यानंतर या रुग्णाला तीव्र ताप, थरथर कापणे, पाठदुखी, गडद रंगाचं लघवी, श्वास घेण्यास त्रास, आणि ब्लड प्रेशन अचानक कमी होणे असे लक्षणं दिसू शकतात. काहीवेळा डॉक्टर औषधांद्वारे परिस्थिती नियंत्रणात आणतात, पण धोका कायम राहतो.
म्हणूनच प्रत्येक रुग्णालयात ब्लड ट्रान्सफ्यूजनपूर्वी “क्रॉस मॅचिंग” केली जाते. यात दाता आणि रुग्णाच्या रक्ताची सुसंगती तपासली जाते. जर कोणतीही विसंगती दिसली, तर रक्त देण्याची प्रक्रिया तत्काळ थांबवली जाते.
advertisement
सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर चुकीचं रक्त देणं जीवघेणं ठरू शकतं. त्यामुळे रक्तदान आणि रक्तचढवण्याच्या प्रक्रियेत दुहेरी तपासणी ही नेहमीच आवश्यक असते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 06, 2025 8:35 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Blood Group : A+ ब्लड ग्रुप व्यक्तीला आणि B+ ग्रुपचं रक्त दिलं तर काय होईल? यामुळे मृत्यू होतो का?


