'घमंड तो रावण का भी टूटा', घरातून बाहेर येताच प्रणित मोरेचा फरहानावर हल्ला, 'मरत का नाहीस' कमेंटवर सणसणीत उत्तर
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Pranit More in Bigg Boss19 : प्रकृतीच्या कारणास्तव घराबाहेर पडलेला कॉमेडियन प्रणित मोरे याने आपली सह-स्पर्धक फरहाना भट्ट हिच्यावर थेट सोशल मीडियातून हल्ला चढवला आहे.
मुंबई : 'बिग बॉस १९' च्या घरात रोज नवनवीन धमाके सुरू आहेत. दरम्यान, प्रकृतीच्या कारणास्तव घराबाहेर पडलेला कॉमेडियन प्रणित मोरे याने आपली सह-स्पर्धक फरहाना भट्ट हिच्यावर थेट सोशल मीडियातून हल्ला चढवला आहे. त्याने फरहानाच्या घरातील वागण्यावर आणि तिच्या काही वादग्रस्त विधानांवर निशाणा साधत एक लांबलचक पोस्ट शेअर केली होती. पण ती काही वेळातच डिलीट करण्यात आली.
घरात असताना फरहाना भट्ट आणि प्रणित मोरे यांच्यातील मैत्री नंतर शत्रुत्वात बदलली होती. घराबाहेर आल्यानंतरही त्यांच्यातील हे शाब्दिक युद्ध सुरूच आहे. फरहानाने केलेल्या काही टोमण्यांवर आणि 'मरून का नाही जात' यांसारख्या विधानांवर प्रणितने सणसणीत प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
"डिग्नीटी? शालिनता? हे शब्द 'बिग बॉस'मध्ये तिच्या असण्याला पूर्णपणे विरोधी आहेत. आम्हाला कळते की तुम्ही बायोमध्ये झेंडा ठेवायचा की नाही हे ठरवण्यात व्यस्त होता, पण एपिसोड पाहणे ही एक साधी पण महत्त्वाची गोष्ट आहे. गेल्या आठवड्यात तिने जे कृत्य केले, त्यानंतर तर आम्हाला चर्चाच करायची इच्छाच नाहीये."
advertisement
'रावणाचाही अहंकार टिकला नाही!'
या पोस्टमध्ये प्रणितने फरहानाच्या नकारात्मकतेवर थेट बोट ठेवले. त्याने फरहानाच्या 'मरून का नाही जात' या शब्दांचा उल्लेख करत, याच नकारात्मकतेमुळे आपल्या प्रकृतीवर परिणाम झाल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले.
पोस्टमध्ये पुढे लिहिलं होतं, "आम्ही मानतो की, तुमची नकारात्मकता काही काळासाठी नक्कीच जिंकली. 'मरून का नाही जात' यांसारख्या वाक्यांमुळे प्रणित नक्कीच आजारी पडला. पण लक्षात ठेवा, हा विजय फार कमी वेळेसाठी आहे. नकारात्मकता कधीच जास्त काळ टिकत नाही. अहंकार तर रावणाचाही तुटला होता, औरंगजेबाचाही तुटला होता... आणि ही तर फक्त फरहाना आहे!
advertisement

'झेंड्या'चा उल्लेख करण्यामागे काय आहे कारण?
प्रणितच्या या पोस्टमध्ये 'झेंडा' या शब्दाचा उल्लेख करणे चर्चेचा विषय ठरला आहे. फरहाना भट्टच्या 'एक्स' प्रोफाइलच्या बायोमध्ये भारत आणि पॅलेस्टाईनचे झेंडे लावलेले आहेत. प्रणितने नेमका याच गोष्टीवरून तिला डिवचल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, इतकी वादग्रस्त पोस्ट काही वेळातच डिलीट केल्यामुळे या प्रकरणाची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच वाढली आहे. दरम्यान, प्रकृती सुधारल्यानंतर प्रणित मोरे पुन्हा घरात एंट्री करणार आहे. त्यामुळे घरात परतल्यावर प्रणित फरहानाला कशा प्रकारे उत्तर देतो हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 06, 2025 8:27 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'घमंड तो रावण का भी टूटा', घरातून बाहेर येताच प्रणित मोरेचा फरहानावर हल्ला, 'मरत का नाहीस' कमेंटवर सणसणीत उत्तर









