पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याचा करायचा बिझनेस?, मुंबईत इथं करा होलसेल दरात खरेदी

Last Updated:

Wholesale Pooja Market: घरात किंवा मंदिरात पूजेसाठी साहित्य आवश्यक असतं. आपल्याला देखील दर्जेदार आणि परवडणाऱ्या दरात पूजा साहित्या घ्याचं असेल तर मुंबईतील होलसेल मार्केटला भेट देऊ शकता.

+
कापूर,

कापूर, तेल अन् अगरबत्ती, पूजेसाठी लागणारं सर्व दर्जेदार साहित्य, मुंबईत होलसेल दरात करा खरेदी

मुंबई: प्रत्येक घरात दररोजचा दिवा, सणासुदीचे पूजन, व्रत, घरगुती समारंभ या सर्व गोष्टींसाठी पूजा साहित्य लागतं. हे पूजासाहित्य वेळेवर आणि योग्य दरात मिळणं गरजेचं असतं. पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू दर्जेदार तर असाव्यात, परंतु खिशालाही परवडणाऱ्या असाव्यात, अशी प्रत्येकाची भावना असते. त्यामुळे दर्जेदार आणि परवडणाऱ्या दरात या वस्तू खरेदीला सर्वांचेच प्राधान्य असते. तुम्ही देखील असाच विचार करत असाल तर मुंबईच्या कुर्ला परिसरात तुमच्यासाठी खास होलसेल मार्केट आहे. याबाबत होलसेल दुकानदार मोहन असरानी यांनी माहिती दिलीये.
advertisement
मुंबईतील कुर्ला परिसरात लक्ष्मी अगरबत्ती भंडार इथे तुम्हाला देवपूजेसाठी लागणारं सगळं साहित्य होलसेल दरात मिळेल. या दुकानात मिळणाऱ्या खास वस्तूंमध्ये प्रीमियम क्वालिटीच्या धूपस्टिकचा समावेश आहे, ज्या केवळ 40 रुपयांपासून सुरू होतात. दिव्यासाठी आवश्यक तेल लहान आणि मोठ्या बाटल्यांमध्ये 40 ते 100 रुपये दरम्यान मिळतं. याशिवाय कापूरदाणी 80 रुपयांना उपलब्ध आहे, ज्याचा वापर तुम्ही कापूर जाळण्यासाठी करू शकता. कापसाची वात 30 रुपये डझन आणि कापूस 80 रुपये डझन आहे. तर दिव्यात टाकण्यासाठी शुद्ध तूप फक्त 200 रुपयांत मिळते.
advertisement
अगरबत्त्यांच्या विविध प्रकारांतून तुम्हाला 30 रुपयांपासून ते 80 रुपयांपर्यंत प्रीमियम क्वालिटीच्या अगरबत्त्या निवडता येतील. अगरबत्ती किलोच्या हिशोबाने देखील मिळते आणि तिची किंमत 300 ते 400 दरम्यान आहे. तसंच घरासाठी आवश्यक रूम फ्रेशनर 70 रुपयांपासून आहे. गुलाब पाणी आणि गंगाजल 20 रुपये, मच्छर अगरबत्ती 80 रुपये डझन, आणि पितांबर 15 रुपये या किफायतशीर दरात मिळते. दुकानात प्रसिद्ध ब्रँड्सची उत्पादनेही आहेत. सायकल ब्रँडची अगरबत्ती 90 रूपयांना 250 ग्रॅम पॅकमध्ये मिळते. तसेच, भीमसेन कापूर सुद्धा येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे.
advertisement
दरम्यान, मुंबईतील या होलसेल दुकानात एकाच ठिकाणी सर्व पूजासामग्री मिळते. त्यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि दर परवडणारे असल्यामुळे खर्चही कमी होतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याचा करायचा बिझनेस?, मुंबईत इथं करा होलसेल दरात खरेदी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement