पिझ्झा, मोमो आणि नुडल्समुळे महिलांमध्ये PCOD आणि PCOS आजार वाढला? स्त्रीरोग तज्ञांनी दिलं उत्तर
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
सध्याला मुलींमध्ये आणि महिलांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये PCOD आणि PCOS यांसारखे गंभीर आजार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. यामागे विविध अशी अनेक कारणं आहेत.
छत्रपती संभाजीनगर: सध्याला मुलींमध्ये आणि महिलांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये PCOD आणि PCOS यांसारखे गंभीर आजार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. यामागे विविध अशी अनेक कारणं आहेत. तर नेमकी काय कारणे आहेत किंवा याच्यावर काय उपाय करावे, याविषयीची सविस्तर माहिती स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर पूजा कोहकडे सपकाळ यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितली आहे.
सध्याला मुलींमध्ये जीवनशैली देखील मोठ्या प्रमाणात बदलल्या आहेत. यामध्ये जास्त ताण घेणे, बाहेरचे खाणे, वजन कमी करणे किंवा वजन वाढवणे अशी विविध कारणे यामध्ये आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बदलती जीवनशैली सध्याला बैठक जीवनशैली वाढत चाललेली आहे यामुळे देखील ही समस्या उद्भवू शकते. त्यासोबतच आपण बाहेरचं पॅकेज फूड खूप खातो ज्यामध्ये पिझ्झा, मॅगी किंवा फास्ट फूड खातो.
advertisement
हे पॅकेज फूड आपण खातो, हे आपल्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. त्यामुळे हे खाणं शक्यतो टाळायला हवे, जे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. व्यायाम न केल्यामुळे वजन वाढते आणि आपल्याला लठ्ठपणा येतो. यामुळे हा त्रास अधिक वाढत जातो. हे सगळं तुम्हाला टाळायचे असेल तर या करता सगळ्यात पहिले वजन कमी करणे गरजेचे आहे. त्यानंतर आपली लाईफस्टाईल बदलणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच घरचे जेवण जास्त करून खाणं आवश्यक आहे.
advertisement
ज्यामध्ये पालेभाज्या कडधान्य डाळी त्यासोबतच फळे या सर्व गोष्टींचा समावेश आपल्या आहारात असला पाहिजे जेणेकरून हा त्रास तुम्हाला होणार नाही. तसेच व्यायाम करणं खूप गरजेचे आहे दररोज व्यायाम करावा योगासने करावे. जेवढे शक्य असेल तेवढे दररोज करावं जेणेकरून तुम्हाला च वजन राहत आहे आणि हा त्रास तुम्हाला होणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलेला आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही काळजी घेतली तर हा त्रास तुम्हाला होणार नाही त्यामुळे तुम्ही सर्वांनी अशा पद्धतीने काळजी घ्यावी असं देखील डॉक्टरांनी सांगितला आहे.
Location :
Maharashtra
First Published :
Dec 09, 2025 7:19 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
पिझ्झा, मोमो आणि नुडल्समुळे महिलांमध्ये PCOD आणि PCOS आजार वाढला? स्त्रीरोग तज्ञांनी दिलं उत्तर








