एसी-फ्रिजवर स्टार रेटिंग का असते? त्याचा नेमका अर्थ काय? समजून घ्याल, तर फायद्यात रहाल!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
वीज बचतीसाठी घरातल्या एसी किंवा फ्रिजसारख्या उपकरणांमध्ये 5 स्टार रेटिंग असलेली उत्पादने निवडणं योग्य ठरतं. उदाहरणार्थ, 3 स्टार एसी वर्षाला 1100 युनिट वीज वापरतो, तर...
तुम्ही कधी एसी किंवा फ्रिज खरेदी करायला गेला असाल, तर त्यावर तुम्हाला काही स्टार दिसले असतील. कुणावर 30 स्टार, कुणावर 4 स्टार, तर कुणावर 5 स्टार! हे स्टार रेटिंग BEE म्हणजे ‘ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी’ ही सरकारी संस्था देते. याचा उद्देश काय असतो बरं? तर हे उपकरण किती वीज वाचवतं हे तुम्हाला सांगणं!
या स्टार रेटिंगचा अर्थ काय असतो?
हे स्टार 1 ते 5 पर्यंत असतात.
- 1 स्टार : याचा अर्थ हे उपकरण कमीतकमी वीज वाचवतं, म्हणजे जास्त वीज वापरतं.
- 5 स्टार : याचा अर्थ हे उपकरण जास्तीत जास्त वीज वाचवतं, म्हणजे कमी वीज वापरतं.
एसी आणि फ्रिजवर स्टार रेटिंगचा काय परिणाम होतो?
स्टार रेटिंग | वीज वापर | वीजबिल |
---|---|---|
3 स्टार | जास्त | जास्त |
4 स्टार | मध्यम | मध्यम |
5 स्टार | सर्वात कमी | सर्वात कमी |
advertisement
खरंच वीज वाचते का?
हो नक्कीच वाचते! हे तुम्हाला एका उदाहरणातून समजून येईल.
समजा तुम्ही तुमचा एसी दिवसात ८ तास चालवता. जर तुमचा एसी 3 स्टारचा असेल, तर तो वर्षभरात अंदाजे 1100 युनिट वीज वापरू शकतो. आणि जर तुमचा एसी 5 स्टारचा असेल, तर तेच काम तो फक्त 850 युनिटमध्ये करू शकतो. आता जर एका युनिटचा भाव 7 रुपये असेल, तर हिशोब करा:
advertisement
3 स्टारसाठी वर्षाचा खर्च : 7700 रुपये
5 स्टारसाठी वर्षाचा खर्च: 5950 रुपये
फरक किती आला? वर्षाला 1750 रुपये!
म्हणजे काय, 5 स्टारचा एसी घ्यायला सुरुवातीला जास्त पैसे लागले तरी, काही वर्षांत तुम्ही विजेच्या बिलात बचत करून ते पैसे वसूल करू शकता!
लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी
- 5 स्टारचे फ्रिज किंवा एसी थोडे महाग असतात, पण ते पुढे तुमच्या विजेच्या बिलात मोठी बचत करतात.
- 2 स्टार रेटिंग दरवर्षी बदलू शकतं. त्यामुळे खरेदी करताना ते कोणत्या वर्षी बनवलंय हे नक्की तपासा.
advertisement
म्हणूनच, या गोष्टींचा विचार करून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला कोणता स्टार रेटिंगचा एसी किंवा फ्रिज घ्यायचा आहे. जेणेकरून तुम्हाला चांगली हवा मिळेल आणि तुमच्या घराच्या विजेचा वापरही जास्त होणार नाही. त्यामुळे पुढच्या वेळी एसी किंवा फ्रिज खरेदी करताना स्टार रेटिंगकडे खास लक्ष द्या. म्हणजे तुमच्या कष्टाचे पैसे फुकट जाणार नाहीत!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 06, 2025 6:10 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
एसी-फ्रिजवर स्टार रेटिंग का असते? त्याचा नेमका अर्थ काय? समजून घ्याल, तर फायद्यात रहाल!