त्वचेवर लाल पुरळ, खाज येण्याच्या समस्येला करु नका दुर्लक्ष; ‘या’ आजाराची आहेत लक्षणं

Last Updated:

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, थंडीत अनेक त्वचाविकारांचा धोका वाढतो. कारण या काळात हवेत आर्द्रता कमी असते.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : थंडीच्या दिवसांत त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागते. कारण या काळात त्वचा कोरडी पडून त्वचेचे काही आजारही उद्भवू शकतात. म्हणून थंडीमध्ये त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. ती कशी घेता येऊ शकते, याच्या काही टिप्स जाणून घेऊ या. त्वचेचे आजार थंडीच्या दिवसांत डोकं वर काढतात. कारण हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यातच थंडीमुळे पुरेसं पाणीही पोटात जात नाही. यामुळे त्वचेचे विकार बळावतात. काही वेळा केसात कोंडा होतो. चेहरा निस्तेज होतो. त्वचा कोरडी पडते व त्वचेचे आजार होतात. त्यामागचं कारण जाणून घेऊन त्यावर काही उपाय करणंही शक्य आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, थंडीत अनेक त्वचाविकारांचा धोका वाढतो. कारण या काळात हवेत आर्द्रता कमी असते. तसंच हवेतलं प्रदूषण जास्त असतं. यामुळे त्वचेचे विकार बळावतात. हिवाळ्यात सोरायसिस, एक्झिमा व केसांचे विकार गंभीर रूप धारण करू शकतात.
एक्झिमा म्हणजे काय?
एक्झिमा ही त्वचेची एक सामान्य समस्या आहे. यात त्वचेवर लाल रंगाचं पुरळ उठतं. त्वचेला खाजही सुटते. काही बाबतीत आधी खाज सुटते व नंतर लाल दाणे दिसतात. त्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास ती संपूर्ण शरीरात पसरू शकते. तुम्हालाही हिवाळ्यात त्वचेवर लाल पुरळ उठलं असेल, तर ताबडतोब त्वचेच्या डॉक्टरांना दाखवा.
advertisement
अशी घ्या त्वचेची काळजी
हिवाळ्यात एक्झिमाची समस्या उद्भवली असेल तर आपल्या आवडीचा साबण व शॅम्पू वापरू नका. तज्ज्ञांच्या सल्ल्यानं योग्य ते लोशन किंवा साबण वापरा. हिवाळ्यात त्वचेतलं पाण्याचं प्रमाण टिकवणं खूप जास्त आवश्यक असतं. त्यासाठी भरपूर पाणी प्या आणि त्वचेवर मॉयश्चरायझर लावा. बाहेर जाताना सनस्क्रीन लावायला विसरू नका. मेलास्मासारखी समस्या असेल, तर सनस्क्रीन आवर्जून लावा.
advertisement
हिवाळ्यात कोरडी हवा असल्यामुळे त्वचाही कोरडी पडते. दररोज मॉयश्चरायझर न लावल्यास हळूहळू त्वचेला खाज सुटते व भेगाही पडतात. काही वेळा पायाच्या भेगांमधून रक्तही येऊ शकतं. त्यासाठी त्वचेतलं पाण्याचं प्रमाण कमी व्हायला नको. काही साबणांमुळेही त्वचा कोरडी पडते. त्यामुळे साबण वापरतानाही तो माइल्ड असेल, याची काळजी घ्यावी. थंडीत एक्झिमासारखा त्वचाविकार उद्भवण्याची शक्यता असते. तसं झाल्यास लगेचच डॉक्टरांना दाखवावं. यामुळे तो पसरणार नाही. थंडीत अशा प्रकारे त्वचेची काळजी घेतल्यास त्यानंतरच्या काळात त्वचेच्या कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
त्वचेवर लाल पुरळ, खाज येण्याच्या समस्येला करु नका दुर्लक्ष; ‘या’ आजाराची आहेत लक्षणं
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement