Akshaya Tritiya 2025 : अक्षय तृतीयेनिमित्ताने घागर-कराकिळीला आलं महत्त्व, पुण्यातील या ठिकाणी मिळेल स्वस्तात
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा सण काही दिवसांवर येऊन ठेपल्याने पुण्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पारंपरिक मातीच्या घागरी आणि कराकिळी खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली आहे.
पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा सण काही दिवसांवर येऊन ठेपल्याने पुण्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, पुण्यातील कुंभार वाड्यात पारंपरिक मातीच्या घागरी आणि कराकिळी खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली आहे. हिंदू संस्कृतीत अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या या दिवशी पूर्वजांच्या स्मरणार्थ घागर पूजन, कृतज्ञतेचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे या पारंपरिक वस्तूंना मोठी मागणी निर्माण झाली आहे.
अक्षय तृतीयेच्या पूजेमध्ये मातीच्या घागरी आणि कराकिळीचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने कुंभार समाजातील व्यावसायिक मागील दोन महिन्यांपासून घागरी व कराकिळी बनवण्याच्या कामात व्यस्त आहेत. माती, राख आणि भुस्याचा वापर करून पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या या वस्तू काळ्या आणि लाल रंगांत बाजारात विक्रीसाठी सज्ज झाल्या आहेत. विक्रीदर 1200 रुपये शेकडा असल्याने विक्रेत्यांच्या व्यवसायात चांगली तेजी आली आहे.
advertisement
धर्मापेक्षा माणूस मोठा! मुस्लिम व्यक्तीवर हिंदू पद्धत्तीने केले अंत्यसंस्कार; दोन मुलींनी दिला अग्नी
कुंभार व्यावसायिक सुभद्रा बावधनकर यांच्या मते, घागर व कराकिळी बनवण्याचा हा व्यवसाय त्यांच्याकडे चार पिढ्यांपासून चालत आलेला आहे. केवळ संपत्ती वाढवण्याचा नव्हे, तर पूर्वजांविषयी आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या सणामुळे पुणेकरांमध्ये खरेदीची चढाओढ पाहायला मिळत आहे. बाजारपेठ, कुंभार वाडा आणि घरोघरी सध्या सणाच्या तयारीची उत्साही लगबग पाहायला मिळत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
April 28, 2025 11:59 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Akshaya Tritiya 2025 : अक्षय तृतीयेनिमित्ताने घागर-कराकिळीला आलं महत्त्व, पुण्यातील या ठिकाणी मिळेल स्वस्तात