मदरश्यामध्ये 10 वर्षांच्या अल्पवयीन मुलासोबत मौलानाने केलं भयानक कृत्य, नांदेडमध्ये संतापाची लाट
- Published by:sachin Salve
Last Updated:
त्रास असह्य होत असल्याने पीडित मुलाने मदरश्याबाहेरील पानटपरी चालकाला हा प्रकार सांगितला आणि मौलानाचं बिंग फुटलं.
नांदेड : मदरश्यात धार्मिक शिक्षण घेणाऱ्या एका दहा वर्षीय मुलावर मौलानाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना नांदेडमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मौलानासह मदरसा चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पण, दोन्ही आरोपी फरार असून शोध घेतला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड शहराजवळच्या वाघी रोड हस्सापुर येथे दार-ए - अरखांम नावाने मदरसा चालवला जातो. या मदरशात जवळपास ३० मुलं निवासी राहून धार्मिक शिक्षण घेतात. अन्य मौलानासह मूळचा बिहार येथील 26 वर्षीय महोमद शाहनवाज हा मौलाना देखील मुलांना शिक्षण देतो.
advertisement
दोन दिवसांपूर्वी आरोपी मौलाना महोमद शाहनवाज याने एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केले. कुणाला सांगू नको, अशी धमकीही या मौलानाने पीडित मुलाला दिला. पण त्रास असह्य होत असल्याने पीडित मुलाने मदरश्याबाहेरील पानटपरी चालकाला हा प्रकार सांगितला. या मुलाकडून हकीकत ऐकून टपरीचालक हैराण झाला आणि मौलानाचं बिंग फुटलं.
advertisement
ही संपूर्ण घटना पीडित मुलाच्या कुटुंबीयांनाही कळाली. पीडित मुलाच्या कुटुंबियाच्या तक्रारीवरुन आरोपी मौलाना शाहनवाजसह मदरसा चालक मौलाना अय्युब खासमी विरोधात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मदरसा चालकाने आरोपीला वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याने त्याला सहआरोपी करण्यात आले आहे. दरम्यान दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
November 28, 2024 6:57 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मदरश्यामध्ये 10 वर्षांच्या अल्पवयीन मुलासोबत मौलानाने केलं भयानक कृत्य, नांदेडमध्ये संतापाची लाट