'100 टक्के विलासरावांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील', रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य; वाद पेटण्याची चिन्ह
- Published by:Sachin S
Last Updated:
लातूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत भाषण करत असताना
लातूर : राज्यात महापालिका निवडणुकीचा प्रचाराचा धुरळा सुरू झाला आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधकांकडून प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. पण, लातूर महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे वाद पेटण्याची चिन्ह आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा लातूरचे सुपुत्र स्व. विलासराव देशमुख यांच्या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये केलेले वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. “विलासरावांच्या आठवणी १०० टक्के लातूरमधून पुसल्या जातील” असे विधान त्यांनी केलं आहे.
advertisement
लातूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत भाषण करत असताना रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं.
भाषणाला सुरुवात झाल्यानंतर चव्हाण म्हणाले की, "सर्वांनी दोन्ही हात ऊंच करून घोषणा द्यायची आहे, भारत माता की जय, वंदे मातरम्, वंदे मातरम्, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, खरंतर आपल्या सर्वांचा उत्साह पाहिला तर लक्षात येतंय की, १०० टक्के विलासरावांच्या आठवणी या शहरातून पुसल्या जातील, यात काही शंका नाही" असं वक्तव्य चव्हाण यांनी केलं.
advertisement
चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. "विलासराव देशमुख यांनी लातूरच्या विकासासाठी दिलेले योगदान आणि त्यांची राजकीय वारसा लक्षात घेता, हे वक्तव्य अत्यंत संवेदनशील आणि अपमानास्पद असल्याची भावना काँग्रेस पदाधिकारी आणि विलासराव देशमुख समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे.
"या वक्तव्यावर काँग्रेसकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून, लातूरच्या अस्मितेवर घाला घालणारे विधान असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसंच भाजपने याबाबत खुलासा करावा आणि रवींद्र चव्हाण यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी केली आहे.
advertisement
दरम्यान, या वक्तव्यावर भाजपकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नसून, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लातूरच्या राजकारणात या वक्तव्याचे पडसाद उमटण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
महाराष्ट्रात राहणारा मराठी तर देशात राहणारा प्रत्येक जण हिंदू - बावनकुळे
तर, “महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस हा मराठीच आहे आणि देशात राहणारा प्रत्येक नागरिक हा हिंदूच आहे." असं वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री तथा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी लातूरमध्ये केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता वाद होण्याची शक्यता आहे. मुंबईतील महापौर हा मराठी होणार का हिंदी या प्रश्नावर उत्तर देताना ते लातूरमध्ये बोलत होते.
advertisement
"उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन भावनिक वातावरण तयार करत आहेत. मात्र भावनात्मक आवाहन करून मतदान मिळणार नाही. मुंबईची जनता विकास पाहते. २५ वर्षांत उबाठाने विकासाची ठोस छाप उमटवली नाही, असं याप्रसंगी बावनकुळे म्हणाले.
view commentsLocation :
Latur,Maharashtra
First Published :
Jan 05, 2026 10:29 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'100 टक्के विलासरावांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील', रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य; वाद पेटण्याची चिन्ह











