Pune Crime: "...नाहीतर तुझी पोलिसांत तक्रार करू", दुकान मालकिणीच्या त्रासाला कंटाळून मृत्यूला कवटाळले
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
दुकान मालकिणीने आपल्याच दुकानात काम करणाऱ्या एका तरूण कामगाराला मानसिक त्रास दिल्याने त्याने थेट आत्महत्याच केली आहे.
पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दुकान मालकिणीने आपल्याच दुकानात काम करणाऱ्या एका तरूण कामगाराला मानसिक त्रास दिल्याने त्याने थेट आत्महत्याच केली आहे. सतत पोलिस धमकीच्या त्रासाला आणि मानसिक त्रासाला कंटाळून 30 वर्षीय तरुणाने धावत्या रेल्वेखाली येऊन आत्महत्याच केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह सात जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. रामदास भरत पवार (वय 30) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
ही आत्महत्येची घटना सातारा जिल्ह्यातील लोणंद परिसरात घडली. येवलेवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत दोन महिलांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती पोलिसांना मृत रामदास पवार याची बहिण रूपाली संतोष पुजारी (वय 33, रा. लोणंद, सातारा) यांनी येवलेवाडी पोलिस ठाण्यात दिली. रामदास यांच्या बहिणीने येवलेवाडी पोलिसांत, शीतल काळे, अरविंद काळे, सतीश सरोदे, नितीन सरोदे, श्रुती कन्हेरे, ऋषी कन्हेरे आणि मोहन सोनार (सर्व रा. कोंढवा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
रामदास पवार कोंढव्यातील येवलेवाडी परिसरात 'शीतल ग्लॅमअप युनिसेक्स सलोन' नावाच्या सलोनमध्ये नोकरीला होता. रामदासचा सलोनच्या मालकिन शीतल काळेसोबत काही कारणास्तव वाद झाला होता. नेमकं वादाचं कारण पोलिसांनी दिलं नाही. वाद झाल्यानंतर सातही आरोपी रामदासला तुझ्याविरोधात पोलिस तक्रार करू अशी धमकी देऊ लागले. त्यांनंतर आरोपींनी रामदास तब्बल पाच लाख रुपयांची मागणी करू लागल्याची माहिती तक्रारीत आहे. आरोपी सतत पैशांची मागणी करत असल्यामुळे रामदास तणावात गेले.
advertisement
आरोपी पैश्यांची सतत मागणी करुन सतत मानसिक त्रास देत असल्यामुळे रामदास पवार तणावात गेला. रामदासने त्याच्या बहिणीला आधीच या संपूर्ण घटनेची पूर्व कल्पना दिली होती. आत्महत्येच्या आधी रामदासने एक सुसाईड नोट लिहिली होती. त्यामध्ये त्याने सोशल मीडियावरील आरोपींच्या त्रासामुळे आपले जीवन संपवत असल्याचा उल्लेख रामदासने त्या नोटमध्ये केला होता. रामदासने एका क्षुल्लक कारणामुळे आपले जीवन संपवल्यामुळे त्याचे कुटुंबीय कमालीचे चिंतेत आहेत. दरम्यान, रामदासने 30 डिसेंबरला लोणंद रेल्वे स्टेशन परिसरात धावत्या रेल्वेखाली उडी मारून त्याने आपले जीवन संपवले. या घटनेनंतर त्याच्या बहिणीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार येवलेवाडी पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. येवलेवाडी पोलिस घटनेची सखोल चौकशी करीत आहेत.
advertisement
view comments
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 05, 2026 10:07 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: "...नाहीतर तुझी पोलिसांत तक्रार करू", दुकान मालकिणीच्या त्रासाला कंटाळून मृत्यूला कवटाळले










