Silver Price: चांदीच्या किंमतीत त्सुनामी, एका रात्रीत मोठी उलथापालथ; Expert म्हणाले, 'महाभूकंप' येण्याआधीच निर्णय घ्या
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Silver Prices: जागतिक कमोडिटी बाजारात भू-राजकीय तणावामुळे प्रचंड अस्थिरता निर्माण झाली असून, त्याचा सर्वात मोठा परिणाम चांदीच्या दरांवर झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात उसळी घेतल्यानंतर भारतातही चांदीने एका दिवसात तब्बल 13,500 रुपये प्रति किलोची झेप घेत गुंतवणूकदार आणि ग्राहकांना धक्का दिला आहे.
मुंबई: जगभरच्या कमोडिटी बाजारात सोमवारी प्रचंड उलथापालथ झाली आणि त्याचा सर्वात मोठा फटका किंवा फायदा चांदीला बसला. अमेरिका-वेनेझुएला तणाव वाढताच ‘सप्लाय शॉक’ची भीती बाजारात पसरली आणि चांदीचे दर अक्षरशः उसळले. परिणामी भारतातही चांदीने एका दिवसात तब्बल 13,500 रुपये प्रति किलो उडी घेतली.
advertisement
आंतरराष्ट्रीय बाजारात काय घडलं?
इंटरनॅशनल मार्केटमध्ये COMEX वर चांदी सुमारे 6% वाढली आणि 75 डॉलर प्रति औंसच्या वर गेल्याचे चित्र दिसले. भू-राजकीय तणाव वाढला की सुरक्षित आणि ‘हार्ड अॅसेट’मध्ये पैसा वळतो त्याचाच परिणाम चांदीच्या किमतींवर झाला, अशी बाजारातील चर्चा आहे.
advertisement
भारतात MCX वर थेट गॅप-अप
जागतिक हालचालींचा धक्का भारतात लगेच जाणवला. MCX वर चांदी गॅप-अप ओपन झाली आणि काही वेळातच 2,49,900 रुपये प्रति किलो या पातळीपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जाते. शुक्रवारी बंद भावाच्या तुलनेत ही उडी अनेक रिटेल गुंतवणूकदारांसाठी धक्कादायक ठरली.
advertisement
चांदी इतकी अचानक का उसळली? यामागचं एकच शब्दात उत्तर भीती होय.
बाजाराला शंका आहे की अमेरिका-वेनेझुएला तणाव वाढल्यास जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम होऊ शकतो. पेरू आणि चाडसारखे देश जागतिक बाजारात चांदीचे महत्त्वाचे पुरवठादार मानले जातात. तणाव वाढला, वाहतूक/एक्सपोर्टमध्ये अडथळे आले, तर मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडण्याची शक्यता वाढते.
advertisement
सोपं समीकरण: सप्लाय कमी + डिमांड तशीच = दर वर.
एक्सपर्ट्स काय संकेत देत आहेत?
मार्केट चर्चांनुसार काही तज्ज्ञांनी चांदी सध्या बुल ट्रेंडमध्ये असल्याचं म्हटलं आहे. त्यांचा अंदाज आहे की इंटरनॅशनल मार्केटमध्ये चांदी 78 डॉलर प्रति औंसपर्यंत जाऊ शकते. पण त्याच वेळी एक इशाराही दिला जातो. दर जितके वर जातील, तितकी नफावसूली तीव्र होण्याची शक्यता. म्हणजेच वेगाने वर जाऊन चांदी अचानक ब्रेकही घेऊ शकते.
advertisement
सामान्य ग्राहकांच्या खिशावर काय परिणाम?
तुम्ही दागिने, नाणी, बिस्किट, भांडी किंवा लग्नसराईसाठी चांदी घेणार असाल, तर खर्च वाढू शकतो. ‘फिजिकल सिल्व्हर’ घेणाऱ्यांना सध्या जास्त दर मोजावे लागण्याची शक्यता आहे. थोडक्यात आज चांदी खरेदी करणे कालच्या तुलनेत अधिक महाग झाले आहे.
advertisement
गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
तज्ज्ञांच्या मतांनुसार, काही जणांना ही तेजी टॉपजवळ असल्यासारखीही वाटू शकते. रॅलीत उशिरा एन्ट्री घेतली, तर वरच्या पातळीवर मोठे खेळाडू नफा काढून घेऊ शकतात आणि मग करेक्शन वेगवान होऊ शकतं.
टेक्निकल चर्चांमध्येही काही पातळ्या सांगितल्या जात आहेत.
MCX वर 2,40,000 च्या वर टिकला दर तर पुढे 2,50,000–2,60,000 पर्यंत जाऊ शकतो. हा दर खाली आला तर 2,30,000 ते 2,23,000 पर्यंत येईल.
चांदीतील ही “त्सुनामीसारखी” तेजी मुख्यतः भू-राजकीय तणाव आणि पुरवठा बाधित होण्याच्या भीतीमुळे आली आहे. ट्रेंड सध्या सकारात्मक दिसतो, पण दर वर असताना जोखमीचे प्रमाणही वाढते हेच चित्र बाजारात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 05, 2026 9:46 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Silver Price: चांदीच्या किंमतीत त्सुनामी, एका रात्रीत मोठी उलथापालथ; Expert म्हणाले, 'महाभूकंप' येण्याआधीच निर्णय घ्या










