advertisement

पुणे-मुंबई धावणाऱ्या 139 बस फेऱ्या रद्द, रद्द झालेल्या गाड्या कोणत्या? वाचा यादी....

Last Updated:

एक्सप्रेस वेवर महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची एकूण 163 वाहने वाहतूक कोंडीत अडकली होती.

पुणे मुंबई धावणाऱ्या एसटी बसेस रद्द
पुणे मुंबई धावणाऱ्या एसटी बसेस रद्द
पुणे : पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या घटनेचा परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवांवर झाला आहे. पुणे मुंबई दरम्यान धावणाऱ्या जवळपास १३९ एसटी बसेस रद्द करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

पुणे-मुंबई रद्द झालेल्या गाड्यांची यादी

परिवहन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, या अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील विविध विभागांमधील एकूण १३९ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये ७३ ई-शिवनेरी आणि ६६ इतर बस फेऱ्यांचा समावेश आहे.
मुंबई सेंट्रल, दादर, ठाणे, बोरीवलीकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. पुढील काही तासासाठी बसेस फेऱ्या बंद राहणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिलेल्या आहेत. वाहतूक सुरळीत झाल्यानंतर पुढचा निर्णय कळवला जाईल, असे एसटी प्रशासनाने सांगितले.
advertisement

राज्य परिवहन विभागाची एकूण १६३ वाहने वाहतूक कोंडीत अडकली

तसेच, या एक्सप्रेस वेवर महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची एकूण १६३ वाहने वाहतूक कोंडीत अडकली होती. यामध्ये सातारा विभागातील ४६, सोलापूर विभागातील ३६, पुणे विभागातील २०, सांगली विभागातील १८, कोल्हापूर विभागातील १३, पालघर विभागातील १२, ठाणे विभागातील ११ आणि मुंबई विभागातील ७ वाहनांचा समावेश आहे.
advertisement

बस सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करणार, राज्य परिवहन विभागाचे स्पष्टीकरण

प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, परिस्थितीचा आढावा घेऊन पर्यायी व्यवस्था उभारण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत होताच बस सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने कळविले आहे.

गॅस टँकर हटवण्याचे आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न

दरम्यान, प्रशासनाकडून गॅस टँकर हटवण्याचे आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कामाला विलंब होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे या कठीण परिस्थितीत स्थानिक सेवाभावी संस्था तसेच धर्मापाल तंतरपाळे यांनी पुढाकार घेत हजारो पाण्याच्या बाटल्या प्रवाशांना वितरित केल्या. त्यामुळे अनेक प्रवाशांना दिलासा मिळाला असून, काही प्रमाणात तरी आधार मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पुणे-मुंबई धावणाऱ्या 139 बस फेऱ्या रद्द, रद्द झालेल्या गाड्या कोणत्या? वाचा यादी....
Next Article
advertisement
Ajit Pawar:  अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा खळबळजनक दावा, ''एका व्यक्तीनं विमानातून...''
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा ख
  • अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने सगळ्या राज्यालाच मोठा धक्का बसला आहे.

  • ष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विमान अपघात प्रकरणात नवा दावा केला

  • अमोल मिटकरींनी या प्रकरणाला आता 'घातपाता'चे नवे वळण दिले आहे.

View All
advertisement