Vaibhav Suryavanshi : 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीचा हेलिकॉप्टर शॉट पाहिलात का? VIDEO पाहून एमएस धोनीची आठवण येईल
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
अंडर 19 वर्ल्डकपमध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात दुसरा क्वॉटर फायनल सामना रोमांचक स्थितीत सूरू आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने दिलेल्या 310 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने 24 बॉलमध्ये अर्धशतकीय खेळी केली होती.
Vaibhav Suryavanshi Helicopter Shot : अंडर 19 वर्ल्डकपमध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात दुसरा क्वॉटर फायनल सामना रोमांचक स्थितीत सूरू आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने दिलेल्या 310 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने 24 बॉलमध्ये अर्धशतकीय खेळी केली होती. या खेळी दरम्यान वैभव सूर्यवंशीने हेलिकॉप्टर शॉर्ट खेळला होता. या शॉर्टचा आता व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना भारताचा दिग्गज क्रिकेटपटू एमएस धोनीची आठवण झाली आहे.
खरं तर फायनल गाठण्यासाठी भारतासमोर 310 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी वैभव सूर्यवंशी आणि आरोन जॉर्ज मैदानात उतरला होता. यावेळी वैभवने सूरवातीला संयमी खेळी करत 24 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं होतं. या अर्धशतकानंतर तो 33 बॉलमध्ये तो 68 धावा करून बाद झाला होता. या खेळीत त्याने 4 षटकार आणि 9 चौकार लगावले होते. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 200 च्या आसपास होता.
advertisement
🚁🚁🚁
Just another chapter in Vaibhav Sooryavanshi’s book of exquisite strokeplay as he smashed a helicopter shot for SIX! 💥#ICCMensU19WC | Semi-Final 2 | #INDvAFG 👉 LIVE NOW ➡️ https://t.co/BH7PyKi0Hq pic.twitter.com/fDuysl86ZP
— Star Sports (@StarSportsIndia) February 4, 2026
advertisement
वैभवच्या या खेळी दरम्यान त्याने एक शॉर्ट खेळला होता. या शॉर्टला हेलिकॉप्टर शॉर्ट म्हणतात. अशाच प्रकारचा शॉर्ट वैभव सूर्यवंशीने आजच्या सामन्यात खेळला होता. विशेष म्हणजे टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू एमएस धोनी अशाप्रकारे शॉर्ट खेळायचा त्यामुळे त्याचा हा शॉर्ट पाहून अनेकांना एमएसधोनीची आठवण झाली आहे.
अफगाणिस्तानचा पहिला डाव
advertisement
दुसऱ्या क्वार्टर फायनल सामन्यात अफगाणिस्तानने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता.हा निर्णय अफगाणिस्तानने योग्यही करून दाखवला कारण त्यांच्या डावाची सूरूवात खूपच चांगली झाली होती. अफगाणिस्तानकडून ओस्मान सदत आणि खालीद अहमदझाई फलंदाजीला उतरले होते. दोघांनी अफगाणिस्तानच्या डावाची चांगली सुरूवात केली होती पण दोघांनाही मोठ्या धावा करता आल्या नाही.
अफगाणिस्तानकडून सलामीवर ओसमान सदतने 39 धावांची तर खालीदने 31 धावांची सर्वाधिक खेळी केली. त्यानंतर फैसल शिनोझादा आणि उझेरूल्लाह निझाईने अफगाणिस्तानचा डाव सावरला होता. दोघांनी यावेळी टीचून फलंदाजी करून 20 ओव्हर भारताला विकेटच काढून दिली नव्हती. या दरम्यान फैसलने 93 बॉलमध्ये 110 धावांची शतकीय खेळी केली. या खेळीत त्याने 15 चौकार मारले होते. त्याच्यासोबत निझाने 101 धावांची शतकीय खेळी केली होती. या खेळीच्या बळावर आता अफगाणिस्तानने 50 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 310 धावा केल्या आहेत.त्यामुळे आता टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी 311 धावा कराव्या लागणार आहेत.
advertisement
भारतासमोर आता 311 धावांचे आव्हान आहे. हे आव्हान खूप मोठे आहे.त्यामुळे आता जर टीम इंडियाला फायनल गाठायची असेल तर त्यांना हे लक्ष्य पुर्ण करावे लागणार आहे. जर टीम इंडियाने हा सामना जिंकला तर फायनलमध्ये टीम इंडियाची लढत ही पहिल्या क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करून विजेत्या ठरलेल्या इंग्लंडशी होणार आहेत. त्यामुळे आता टीम इंडिया आता अफगाणिस्तानला हरवून फायनलला पोहोचते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 04, 2026 7:47 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi : 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीचा हेलिकॉप्टर शॉट पाहिलात का? VIDEO पाहून एमएस धोनीची आठवण येईल






