Dhule: 14 वर्षांच्या मुलाला बैलगाडीला बांधलं अन् आग पेटवून चटके दिली, तो रडत होता, पण सोडलं नाही, धुळ्यातील घटना
- Reported by:Deepak Borase
- Published by:Sachin S
Last Updated:
या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी मुलाला चटके देणाऱ्या चिंतामण कोळी आणि सचिन कोळी या दोघांना ताब्यात घेतलं आहे
दिपक बोरसे, प्रतिनिधी
धुळे : धुळ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ट्रॅक्टरचा लाईट चोरल्याच्या संशयावरून एका १४ वर्षीय मुलाचा अमानुष छळ केल्याची घटना समोर आली आहे. या मुलाचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर त्यालाा चटके देऊन बेदम मारहाण करण्यात आली. जखमी मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातील भामपुर गावात ही घटना घडली आहे. हिमांशू गवळे असं या पीडित मुलाचं नाव आहे. तर चिंतामण कोळी आणि सचिन कोळी अशी आरोपींची नाव आहे. या दोन्ही आरोपींनी पीडित मुलाचं दुपारी अपहरण केलं. भामपूर गावाच्या परिसरात एक वीट भट्टी आहे. या परिसरात आरोपींनी पीडित मुलाचं गाडीत बसवून अपहरण केलं होतं. त्यानंतर आरोपी चिंतामण कोळी आणि सचिन कोळी यांनी या मुलाला एका लोखंडी बैलगाडीला उलटं बांधलं आणि खाली आग पेटवली. त्यानंतर मारहाण करून या मुलाला सोडून दिलं.
advertisement
जखमी अवस्थेत हा पीडित मुलगा आपल्या कुटुंबीयांकडे आला आणि त्याने हकीकत सांगितली. भामपूर शिवारात असलेल्या शेतातून ट्रॅक्टरचे लाईट चोरल्याच्या संशयातून चिंतामण कोळी आणि सचिन कोळी यांनी हिमांशूला पकडून नेलं होतं. त्यानंतर बैलगाडीला बांधलं आणि त्याच्या पाठीला चटके दिल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेत जखमी झालेल्या मुलाला शिरपूर उपजिल्हा रुग्णात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी मुलाला चटके देणाऱ्या चिंतामण कोळी आणि सचिन कोळी या दोघांना ताब्यात घेतलं आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर याप्रकरणी शिरपूर शहर पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
Location :
Dhule,Maharashtra
First Published :
Nov 22, 2025 10:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dhule: 14 वर्षांच्या मुलाला बैलगाडीला बांधलं अन् आग पेटवून चटके दिली, तो रडत होता, पण सोडलं नाही, धुळ्यातील घटना







