Beed: 15 वर्षांच्या मुलगी ट्युशनला चालली होती, कारने फिरायला जाऊ सांगितलं अन्.., बीडमधील संतापजनक घटना
- Reported by:SURESH JADHAV
- Published by:Sachin S
Last Updated:
अल्पवयीन मुलगी केज इथं ट्युशनला जाण्यासाठी आली असता आरोपी धीरज सांजुरे त्या मुलीला एका कारमधून घेऊन गेला.
बीड : गुन्हेगारांनी बजबजपुरी झालेल्या बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना केज तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे. याच गावात राहत असलेली 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमाने अत्याचार केला. अल्पवयीन पीडित मुलीची आरोपी धीरज सांजुरे याच्याशी ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपी धीरज सांजुरे याने भेटण्याच्या उद्देशाने दिनांक 6 जानेवारी रोजी पीडित अल्पवयीन मुलीला फिरायला जाण्याचं आमिष दाखविलं. त्यानंतर दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी सकाळी ती अल्पवयीन मुलगी केज इथं ट्युशनला जाण्यासाठी आली असता सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास आरोपी धीरज सांजुरे त्या मुलीला एका कारमधून घेऊन गेला.
advertisement
यापूर्वी एक महिन्याअगोदर हाच आरोपी तिला धारूर तालुक्यातील अंबाचोंडी येथील डोंगरात घेऊन गेला होता. कारने गेल्यानंतर एका निर्जनस्थळी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत त्याने अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला असल्याची घटना घडली. घरी आल्यानंतर त्या पीडित अल्पवयीन मुलीने ही माहिती तिच्या पालकांना दिली.
आपल्या मुलीसोबत घडलेल्या या प्रकारामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यानंतर पालकांनी तात्काळ पीडित मुलीसह केज पोलीस ठाणे गाठून या घटनेची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना दिली. दरम्यान, याप्रकरणी केज येथील पोलीस ठाण्यात आरोपी धीरज बाळासाहेब सांजुरे विरोधात गुर नं 09/2026 कलम 65 (1), 64 (2) (M), 87, 137 (2) bns. सह कलम 4,6 पोक्सो अंतर्गत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं आहे. आरोपी धिरजला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
view commentsLocation :
Bid Rural,Bid,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 4:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed: 15 वर्षांच्या मुलगी ट्युशनला चालली होती, कारने फिरायला जाऊ सांगितलं अन्.., बीडमधील संतापजनक घटना










