मोठी बातमी! राज्याच्या दोन उपमुख्यमंत्र्यासह 20 नेत्यांना 'ती' वक्तव्ये भोवणार, कलेक्टरांना अहवाल देण्याचे आदेश

Last Updated:

नगरपरिषदांच्या निवडणूक प्रचारादरम्यान अशी काही वक्तव्ये नेत्यांकडून झाली असून याची दखल निवडणूक आयोगाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

News18
News18
राहुल झोरी, प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून प्रचाराचा धुराळा उडविला जात आहे. अशातच मतदानासाठी काही तास उरलेले असतानाच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील प्रचाराच्या रणधुमाळीत प्रलोभने देणाऱ्या 20 नेत्यांच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आली असून या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवण्यात आला आहे.
राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे. राज्यात 4 नोव्हेंबर पासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर केंद्र किंवा राज्य सरकारकडून कोणत्याही नवीन योजना किंवा नवीन घोषणा करता येत नाही, तसे कोणती प्रलोभने देखील देता येत नाही. मात्र नगरपरिषदांच्या निवडणूक प्रचारादरम्यान अशी काही वक्तव्ये नेत्यांकडून झाली असून याची दखल निवडणूक आयोगाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून याचे उल्लंघन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
advertisement

20 नेत्यांच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगाकडून दखल 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गुलाबराव पाटील, संजय शिरसाठ, जयकुमार गोरे, चित्रा वाघ यांनी आचारसंहिता लागू झाली असताना मतदारांना प्रलोभने देणारी वक्तव्य केली असून ती वक्तव्य त्यांना भोवण्याची शक्यता आहे. राज्यातील प्रचाराच्या रणधुमाळीत प्रलोभने देणाऱ्या 20 नेत्यांच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
advertisement

जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला

राज्य निवडणूक आयोगाने ज्या ठिकाणी संबंधित नेत्यांनी वक्तव्य केली आहेत त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून तत्काळ अहवाल मागवला आहे. अजित पवार यांच्याकडून निधीला कात्री लावण्याचं वक्तव्य, गुलाबराव पाटील यांच्याकडून लक्ष्मी दर्शन होणार असल्याचं वक्तव्य, एकनाथ शिंदे यांच्याकडून तिजोरीच्या चाव्या, चित्रा वाघ यांच्याकडून खा कुणाचं पण मटण मात्र दाबा कमळाचं बटण अशा वक्तव्यांची दखल निवडणूक आयोगाकडून घेण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिली आहे.
advertisement

काय म्हणाले होते अजित पवार? 

जर तुम्ही सर्व अठरा उमेदवार निवडून दिले तर मी तुम्हाला सर्व विकास कामे करून देईन आणि माझ्याकडे चौदाशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे. परंतु, जर मतांमध्ये काठ मारली, तर निधीलाही काठ मारणार आहे.

काय म्हणाले गुलाबराव पाटील? 

भरपूर लक्ष्मी येणार तसेच विधानसभा निवडणुकीच्या काळातही मोठ्या प्रमाणात लक्ष्मी वाटली गेली.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मोठी बातमी! राज्याच्या दोन उपमुख्यमंत्र्यासह 20 नेत्यांना 'ती' वक्तव्ये भोवणार, कलेक्टरांना अहवाल देण्याचे आदेश
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement