Buldhana: बायकोला त्रास दिला, शेतात बोलावून दगडाने ठेचून संपवला, पतीच्या कृत्याने बुलडाणा हादरलं
- Published by:Sachin S
Last Updated:
मृत राहुल बागड हा आरोपी ओम केनवडकरच्या पत्नीला त्रास देत होता. याबद्दल राहुलला समजावूनही सांगितलं होतं.
राहुल खंडारे, प्रतिनिधी
बुलढाणा : बुलडाण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आाली आहे. आपल्या पत्नीला त्रास देणाऱ्या तरुणाचा नवऱ्यानं खून केल्याची घटना घडली आहे. दगडाने ठेचून या तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आलाा आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातल्या खंडाळा खामखेड रोडवरील एमआयडीसी परिसरात ही घटना घडली. गुरुवारी सकाळी १० वाजता मेहकर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या खामखेड रोडवरील एमआयडीसी परिसरातील शेतात ४ राहुल भानुदास बाजड (वय २८) याचा दगडाने ठेचलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. अज्ञात मारेकऱ्याने दगडाने ठेचून राहुलचाा खून केला होता. मृत राहुल हा वाशिम जिल्ह्यातील केनवड इथं राहणारा होता. त्यांचं कापड्याचं दुकान होतं.
advertisement
तासाभरात मारेकऱ्याला अटक
राहुलचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून घटनेचा तपास सुरू केला. मेहकर पोलिसांनी काही तासांमध्येच शोध घेत मारेकऱ्याला गजाआड केलं. ओम श्यामराव केनवडकर (वय ३६) असं राहुलचा खून करणाऱ्या आरोपीचे नाव असून तो केनवड (ता. रिसोड, जि. वाशीम) येथील रहिवासी आहे.
मृत राहुल बागड हा आरोपी ओम केनवडकरच्या पत्नीला त्रास देत होता. याबद्दल राहुलला समजावूनही सांगितलं होतं. पत्नीला त्रास देत असल्याने संतप्त झालेल्या ओमने राहुलची दगडाने ठेचून हत्या केली, असल्याचं कबुल केलं. या प्रकरणी ओम केनवडकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
Location :
Buldana,Maharashtra
First Published :
Mar 05, 2026 4:56 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Buldhana: बायकोला त्रास दिला, शेतात बोलावून दगडाने ठेचून संपवला, पतीच्या कृत्याने बुलडाणा हादरलं








