Thane: ठाण्यात भाजपला दे धक्का, भाजपच्या 5 ज्येष्ठ शिलेदारांचा शिवसेनेत प्रवेश!
- Reported by:UDAY JADHAV
- Published by:Sachin S
Last Updated:
शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत भाजपच्या ५ ज्येष्ठ नगरसेवकांनी जाहीर प्रवेश केला आहे.
ठाणे : राज्यात स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. सगळ्याच राजकीय पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. तर दुसरीकडे पक्षप्रवेशाचा धडाका सुरू आहे. अशातच ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून ५ ज्येष्ठ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत भाजपच्या ५ ज्येष्ठ नगरसेवकांनी जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे उल्हासनगरच्या राजकारणात मोठा भूकंप मानला जात आहे. या प्रवेशामुळे निवडणूक समीकरणे बदलण्याची चिन्हे आहे. उल्हासनगर महापालिकेतील भाजपचे पाच ज्येष्ठ नगरसेवक जमनू पुरसवानी, प्रकाश मखिजा, महेश सुखरामानी, किशोर वनवारी आणि मीना सोंडे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला.
advertisement
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून जुन्या कार्यकर्त्यांचा पक्षत्याग केला आहे. या प्रवेशामुळे उल्हासनगरातील शिवसेनेची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याची राजकीय चर्चा आहे. तर भाजपमध्ये गदारोळ माजल्याची चर्चा, दिपेश म्हात्रे यांच्या भाजप प्रवेशानंतर रवींद्र चव्हाण यांना शिवसेनेकडून दिलेला हा धक्कातंत्र असल्याची चर्चा आहे.
पाच नगरसेवकांची पक्ष सोडण्याची कारणं
सुत्रांच्या माहुतीनुसार, पाच नगरसेवकांची पक्ष सोडण्याची वेगवेगळी कारण दिली आहे. २०२३ पासून ३० कोटींचा आमदार निधी वापराविना पडून असल्याची नाराजी बोलून दाखवली आहे. पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रारी करूनही दखल न घेतल्याचा आरोप केला आहे. सलग ५ वेळा निवडून आलेले जमनू पुरसवानी यांच्यासह सर्वांनी धनुष्यबाण स्वीकारला, हिंदुत्व आणि एनडीएमध्ये राहायचं” म्हणूनच शिवसेनेची निवड केल्याचं नगरसेवकांनी वक्तव्य केलं आहे.
advertisement
रवींद्र चव्हाण यांच्यावर नाराजी
दरम्यान, नगरसेवकांना शिवसेना–भाजप युती हवी होती, स्थानिक पक्ष युतीबाबत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भूमिकेवरून नगरसेवकांत तीव्र नाराजीची चर्चा आहे. तसंच, बाहेरून आलेल्या नेत्यांना जबाबदाऱ्या दिल्या जातात तर जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होतंय, त्यामुळे हा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया भाजपच्या नगरसेवकांनी दिली. तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणखी पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Nov 14, 2025 8:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Thane: ठाण्यात भाजपला दे धक्का, भाजपच्या 5 ज्येष्ठ शिलेदारांचा शिवसेनेत प्रवेश!








