‎Chhatrapati Sambhajinagar: दुचाकीवरून आला, अश्लील इशारे केले अन्..! छेड काढणाऱ्याला तरुणींनी दाखवला रुद्रावतार

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक महिला आणि मुलींना त्रास देण्याचा प्रयत्न करतात.

‎Chhatrapati Sambhajinagar: दुचाकीवरून आला, अश्लील इशारे केले अन्..! छेड काढणाऱ्याला तरुणींनी दाखवला रुद्रावतार
‎Chhatrapati Sambhajinagar: दुचाकीवरून आला, अश्लील इशारे केले अन्..! छेड काढणाऱ्याला तरुणींनी दाखवला रुद्रावतार
छत्रपती संभाजीनगर: सध्या शारदीय नवरात्रौत्सव सुरू आहे. या काळात सर्वत्र स्त्रीशक्तीची पूजा केली जाते. मात्र, काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक याच स्त्रीशक्तीला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये अशीच एक घटना घडली आहे. जालना रोडवरील सेव्हन हिल परिसरात एका दुचाकीस्वाराने तरुणींना अश्लील इशारे केले. संतापलेल्या तरुणींनी त्याचा पाठलाग करून त्याला चांगलाच चोप दिला.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, ‎‎शुक्रवारी (26 सप्टेंबर) संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जालना रोडवर उभ्या असलेल्या दोन तरुणींची एका दुचाकीस्वाराने छेड काढली. हा प्रकार करून तो तरुण वेगात दुचाकी चालवत पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, या दोन्ही तरुणींनी त्याचा पाठलाग सुरू केला. त्यांनी त्या तरुणाला गाठून जाब विचारला. यावेळी बघ्यांची गर्दी जमली.
advertisement
‎संतप्त तरुणींनी त्याला फैलावर घेत त्याच्या कानशिलात लगावली. मुलींचा संताप पाहून नागरिकांनी धाव घेत तरुणाला चांगलाच चोप दिला. ‎आपण पुरते अडकल्याचं लक्षात येताच त्याने तरुणींची हात जोडून माफी मागितली. तरुणाने गयावया करून, तरुणींची माफी मागितली. 'पुन्हा छेड काढशील, तर याद राख' असा इशारा देऊन त्याला सोडून देण्यात आलं.
advertisement
तरुणाला सोडून देत तरुणी निघून गेल्या. त्यानंतर बराच वेळ संशयित रस्त्यावर बसून होता. यामुळे रहदारीत अडथळा निर्माण झाला होता. या प्रकरणाची रात्री उशिरापर्यंत पुंडलिकनगर पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही नोंद नव्हती.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
‎Chhatrapati Sambhajinagar: दुचाकीवरून आला, अश्लील इशारे केले अन्..! छेड काढणाऱ्याला तरुणींनी दाखवला रुद्रावतार
Next Article
advertisement
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री, 'या' अभिनेत्यासाठी वेडी
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री असं का म्हणाली?
    View All
    advertisement