छत्रपती संभाजीनगरमध्ये विवाहितेचा छळ, माहेरहून पैसे आणण्यासाठी सासरच्या लोकांकडून दिला जात होता त्रास; गुन्हा दाखल
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
सध्याच्या काळात महिलांवरीर घरगुती हिंसाचार आणि मानसिक अत्याचाराच्या घटना चिंताजनकरीत्या वाढत आहेत. पती-पत्नीतील छोट्या वादातून सुरुवात होणारा त्रास अनेकदा छळाच्या गंभीर पातळीपर्यंत जात असल्याचे उदाहरण पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आले आहे.
छत्रपती संभाजीनगर: सध्याच्या काळात महिलांवरीर घरगुती हिंसाचार आणि मानसिक अत्याचाराच्या घटना चिंताजनकरीत्या वाढत आहेत. पती-पत्नीतील छोट्या वादातून सुरुवात होणारा त्रास अनेकदा छळाच्या गंभीर पातळीपर्यंत जात असल्याचे उदाहरण पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आले आहे. याप्रकरणी सासरच्या सर्व जणांविरुद्ध उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
रमानगर भागात एका 20 वर्षीय विवाहितेवर घर बांधण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपये आणावेत असा सातत्याने दबाव टाकत तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 23 एप्रिल 2024 ते 20 डिसेंबर 2025 या कालावधीत हा छळ सुरू असल्याचे तिच्या फिर्यादीत नमूद आहे.फिर्यादीनुसार, पती विजय गंगावणे याच्यासह सासू संगीता गंगावणे, सासरे विजय गंगावणे, नणंद आम्रपाली दाणे, दीपाली बनकर, रुपाली मोकळे आणि सुजाता (सर्व रमानगर, छत्रपती संभाजीनगर) यांनी सतत वाद घालत तिला अपमानित केले.
advertisement
‘तू काळी आहेस’ अशा अवमानास्पद शब्दांत तिची निंदानालस्ती करणे, शिवीगाळ करणे आणि मारहाण करणे असा त्रास तिला वारंवार सहन करावा लागला. लग्नावेळी 50 हजार रुपये स्वीकारूनही सासरकडून पुन्हा तीन लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात आल्याचेही तिने तक्रारीत सांगितले. पैसे आणण्यास नकार दिल्यावर तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.या प्रकरणात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार फिरंगे करीत आहेत.
Location :
Maharashtra
First Published :
December 05, 2025 7:24 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
छत्रपती संभाजीनगरमध्ये विवाहितेचा छळ, माहेरहून पैसे आणण्यासाठी सासरच्या लोकांकडून दिला जात होता त्रास; गुन्हा दाखल


