Chhatrapati Sambhajinar: स्वयंपाक करताना गॅस शेगडीजवळ भयानक घडलं, वृद्ध महिलेचा मृत्यू, छ.संभाजीनगरमधील घटना
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
Chhatrapati Sambhajinar News: स्वयंपाक करत असताना अचानक गॅसचा भडका उडाल्याने 77 वर्षीय वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वैजापूर तालुक्यातील धोंदलगावात शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली आहे.
छत्रपती संभाजीनगर: स्वयंपाक करत असताना अचानक गॅसचा भडका उडाल्याने 77 वर्षीय वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वैजापूर तालुक्यातील धोंदलगावात शनिवारी (3 जानेवारी) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली आहे. होरपळून मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचं नाव गयाबाई लुखा वाघ असं आहे.
गयाबाई वाघ या घरात एकट्याच वास्तव्यास होत्या. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्या स्वयंपाक करत असताना गॅस शेगडी पेटवताच अचानक जोरदार भडका उडाला. या आगीत त्या गंभीररित्या भाजल्या गेल्या. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने मदतीला धाव घेत गयाबाईंना खासगी वाहनातून उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले.
मात्र, त्यांची प्रकृती अत्यावस्थ असल्याने उपचार सुरू असतानाच शनिवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे धोंदलगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गयाबाई यांच्या पश्चात भाऊ, तीन बहिणी, भाचे असा परिवार असून या अपघाताने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, घरगुती गॅस वापरताना आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे असून अशा घटनांमुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, असे आवाहनही यानिमित्ताने ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
Location :
Maharashtra
First Published :
Jan 05, 2026 7:45 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Chhatrapati Sambhajinar: स्वयंपाक करताना गॅस शेगडीजवळ भयानक घडलं, वृद्ध महिलेचा मृत्यू, छ.संभाजीनगरमधील घटना










