आता यायला लागतंय! अनलिमिटेड ढवरा मटण थाळी आता नाशिकमध्ये! किंमत किती?
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
नाशिककरांनो! तुमच्यासाठी लोकल १८ घेऊन आले आहे आहोत एक जबरदस्त आणि आनंदाची बातमी! खवय्यांसाठी एक नवी पर्वणी! धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्याची ओळख असलेली, खमंग आणि चविष्ट 'भाग्यश्री मटण थाळी' आता नाशिकमध्ये दाखल झाली आहे!
नाशिककरांनो! तुमच्यासाठी लोकल 18 घेऊन आले आहे, एक जबरदस्त आणि आनंदाची बातमी! खवय्यांसाठी एक नवी पर्वणी! धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्याची ओळख असलेली, खमंग आणि चविष्ट 'भाग्यश्री मटण थाळी' आता नाशिकमध्ये दाखल झाली आहे!
फक्त 250 मध्ये अनलिमिटेड मटण थाळी आता नाशिकमध्ये मिळणार आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत! फक्त 250 रूपयामध्ये ही मटन थाळी तुम्ही पोटभर आणि मनसोक्त खाऊन जेवणाचा अस्सल आनंद घेऊ शकता!
शेतीत काही ठोस उत्पन्न मिळत नाही, या विचारातून बाहेर पडत आणि शेतीला जोडधंदा असावा म्हणून नाशिकमधील शेतकरी दत्ता धिंडे यांनी हे धाडस केले. मटण थाळीसाठी प्रसिद्ध असलेल्या धाराशिवच्या 'भाग्यश्री मटण हॉटेल'ची शाखा त्यांनी नाशिकमध्ये सुरू केली.
advertisement
त्यांच्या या व्यवसायामुळे एका सामान्य शेतकर्याला आज दरमहा चांगले उत्पन्न मिळवण्यास मदत झाली असल्याचे धिंडे यांनी 'लोकल 18' सोबत बोलताना सांगितले की, त्यांच्या हॉटेलमध्ये रोजच्या 550 पेक्षा जास्त मटण थाळ्यांची विक्री होते!
२५० रुपयांच्या थाळीत काय मिळते?
- चुलीवरील ढवर मटण: धाराशिवच्या खास मसाल्यातील, चुलीवर शिजवलेलं खमंग मटण!
- अनलिमिटेड मटण सूप: पौष्टिक आणि चविष्ट मटण सूप.
- ज्वारी आणि बाजरी भाकरी आणि चपाती: हवी तेवढी!
- इंद्रायणी भात: सुगंधी आणि मऊसूत इंद्रायणी तांदळाचा भात.
- रस्सा: हवा तेवढा, अनलिमिटेड रस्सा!
advertisement
या चवीमुळे नाशिक शहरातीलच नव्हे, तर आजूबाजूच्या गावातून देखील नागरिक या थाळीचा अस्सल आनंद घेण्यासाठी गर्दी करत आहेत.
नाशिकमध्ये 'भाग्यश्री मटण हॉटेल' कुठे आहे?
view commentsछत्रपती संभाजी महाराज रोड, गल्ली क्रमांक 4, यश लॉन्स आणि मधुरम लॉन्सच्या पाठीमागे, स्वराज्य नगर, नाशिक...
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
November 18, 2025 4:24 PM IST

