हरायचं नाही! शेतकऱ्याने म्हशी पालनातून काढला श्रीमंत होण्याचा मार्ग, आता महिन्याला इतकी कमाई
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
हिंम्मत न हारता आवड म्हणून गेल्या दोन वर्षांपासून एजास म्हैसपालन आणि दुग्ध व्यवसाय नियोजित पद्धतीने पुढे नेत आहे. सुरुवातीच्या काळात दोन म्हशी खरेदी केल्या त्यांच्यापासूनच या व्यवसायामध्ये वाढ होत गेली आणि आजच्या घडीला 7 म्हशी आहेत.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करमाड येथील एजास शेख यांचा वडिलोत्पार्जित म्हैस पालनाचा व्यवसाय आहे. मात्र हा व्यवसाय काही कारणास्तव काही काळाने बंद झाला होता. हिंम्मत न हारता आवड म्हणून गेल्या दोन वर्षांपासून एजास म्हैसपालन आणि दुग्ध व्यवसाय नियोजित पद्धतीने पुढे नेत आहे. सुरुवातीच्या काळात दोन म्हशी खरेदी केल्या त्यांच्यापासूनच या व्यवसायामध्ये वाढ होत गेली आणि आजच्या घडीला 7 म्हशी आहेत.
वडिलोत्पार्जित म्हशींच्या माध्यमातून दररोज 60 लिटर दूध काढले जाते, त्याची विक्री केली जाते. या व्यवसायाच्या माध्यमातून महिन्याला 70 ते 75 हजार रुपयांची कमाई होत असल्याचे एजास शेखने लोकल 18 सोबत बोलताना सांगितले. करमाड येथे म्हैस पालनाचा व्यवसाय एजास शेख गेल्या दोन वर्षांपासून करत आहे. म्हशींना खाण्यासाठी चारा आणि मक्काचा मुरघास तसेच सकाळ- संध्याकाळ वैरण असते. याबरोबरच सर्की ढेप व सुग्रास या जनावरांना खाण्यासाठी दिली जाते. म्हशींचे सर्व खाद्य विकत घेऊन त्याचे नियोजन केले जाते.
advertisement
म्हैस पालन व्यवसाय करण्यासाठी काय करावे?
म्हैस पालन आणि दुग्ध व्यवसाय करायचा झाल्यास त्यामध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून देण्याची तयारी असायला हवी. तेवढी स्वतःमध्ये हिंम्मत असायला पाहिजे की, व्यवसाय आपण करू शकतो. कारण की, या व्यवसायामध्ये दूध काढणे, चारा- पाणी करणे, गोठा साफ करणे अशी सर्व कामे स्वतःला आली पाहिजे. त्या व्यवसायामध्ये कामगार टिकत नसल्याचे देखील शेख यांनी म्हटले आहे.
advertisement
म्हैस पालनाचा व्यवसाय का करावा?
view commentsइतरांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतः मालक म्हणून हा व्यवसाय केला तर उत्कृष्ट काम आहे. तसेच दुसऱ्यांकडून किती दिवस पगार घ्यायचा आपण देखील कधीतरी इतरांना रोजगार दिला पाहिजे. त्यांना पगार दिला पाहिजे असे आवाहन देखील एजास शेखने तरुणांना केले आहे.
Location :
Maharashtra
First Published :
December 08, 2025 9:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
हरायचं नाही! शेतकऱ्याने म्हशी पालनातून काढला श्रीमंत होण्याचा मार्ग, आता महिन्याला इतकी कमाई

