आजचं हवामान: थंडीचा तडाखा वाढणार! महाराष्ट्रात पुढील ७२ तासांत तापमानाचा पारा घसरणार; हवामान विभागाचा नवा अलर्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Weather Alert: उत्तर भारतातील थंडीची लाट महाराष्ट्रात पोहोचली असून नाशिक, जळगाव, विदर्भात तापमान घटणार आहे. उमाशंकर दास यांच्या माहितीनुसार पुढील दिवसांत कोरडी थंडी वाढणार.
Weather Alert: उत्तर भारतात सध्या थंडीची भीषण लाट आणि दाट धुक्याचे साम्राज्य पसरलेले असताना, त्याचे परिणाम आता महाराष्ट्रातही जाणवू लागणार आहेत. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात येत्या २४ तासांनंतर किमान तापमानात मोठी घट होण्याची शक्यता असून, थंडीचा कडाका पुन्हा एकदा वाढणार आहे. घाटमाथ्यावर मंगळवारी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर पुन्हा थंडीचा जोर वाढला आहे.
पुढील ५ दिवसांचा
राज्यात किमान तापमानात कोणताही मोठा बदल जाणवणार नाही. वातावरण कोरडे राहील. पुढील ३ दिवस उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होईल. प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र प्रामुख्याने नाशिक, जळगाव, विदर्भ आणि मराठवाड्यात हुडहुडी वाढेल. त्यानंतरचे २ दिवस म्हणजे १८ जानेवारीपासून तापमानात पुन्हा २ ते ३ अंशांनी वाढ होऊन थंडीचा जोर ओसरण्यास सुरुवात होईल अशी माहिती हवामान तज्ज्ञ उमाशंकर दास यांनी दिली.
advertisement
उत्तर भारतात रेड अलर्ट, महाराष्ट्रावर परिणाम?
पंजाब, हरियाणा आणि चंदिगडमध्ये सध्या भीषण शीत लहरीमुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तेथील काही भागांत दृश्यमानता शून्य मीटरवर पोहोचली आहे. या थंड वाऱ्यांचा प्रवाह महाराष्ट्राकडे येत असल्याने, विशेषतः पहाटेच्या वेळी उत्तर महाराष्ट्रात दाट धुक्याची चादर पाहायला मिळू शकते. नाशिक, धुळे आणि जळगावमध्ये तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली जाण्याची शक्यता आहे. पुण्यातही रात्रीचा गारवा वाढणार असून किमान तापमान १२ ते १३ अंशांपर्यंत खाली येऊ शकते. मुंबईत थंडीचा कडाका उत्तर महाराष्ट्राच्या तुलनेत कमी असेल, मात्र रात्रीच्या हवेत गारवा जाणवेल.
advertisement
कोकणात ढगाळ वातावरण राहणार
हवामान तज्ज्ञ उमाशंकर दास यांनी दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू आणि केरळच्या आसपास साक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. त्यामुळे दक्षिणेकडे पावसाचा जोर राहणार आहे. तर उत्तरेकडे लडाखपर्यंत सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे पाऊस, हिमवृष्टी आणि थंडीचा कडाका कायम राहणार आहे. अरबी समुद्रात सध्या काही हालचाल जाणवत नाही. त्यामुळे तूर्तास अवकाळीचा धोका नाही. मात्र दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे कोकणात काही अंशी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
advertisement
दक्षिण भारतात पावसाचा जोर ओसरणार
गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकच्या अंतर्गत भागात ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडत होता. मात्र, पुढील ३ दिवसांत दक्षिण भारतातील हा पाऊस पूर्णपणे थांबण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे वाऱ्यांची दिशा बदलून महाराष्ट्रात कोरडी थंडी वाढण्यास मदत होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 7:08 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आजचं हवामान: थंडीचा तडाखा वाढणार! महाराष्ट्रात पुढील ७२ तासांत तापमानाचा पारा घसरणार; हवामान विभागाचा नवा अलर्ट







