आजचं हवामान: सोसाट्याचा वारा अन् ढगांचा गडगडाट, 27 जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागाकडून अलर्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
राज्यात मान्सूनची एंट्री झाली असली तरी म्हणावा तसा पाऊस नाही. 27 जिल्ह्यांना यलो अलर्ट, 30-50 किमी/तास वेगाने वारे, विजा, मेघगर्जना आणि हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज.
मुंबई: पावसाचा खेळ सुरूच आहे. एकीकडे मेघगर्जना, विजांचा आवाज आणि मुसळधार सरी तर दुसरीकडे, पाऊस गेला की उकाड्याचा कहर! राज्यात मान्सूनची एंट्री झाली खरी, पण म्हणावा तसा पाऊस पडला नाही. मान्सूनचे वारे थांबले असून अगदी मंद गतीनं पुढे सरकत आहेत. त्यामुळे पाऊस येतो, जातो आणि पुन्हा थोडा वेळ दमट उष्ण वातावरण असतं अशी सध्या परिस्थिती आहे.
आज राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 30 ते 50 किमी/तास वेगाने सोसाट्याचे वारे, विजा, मेघगर्जना आणि हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या सरी अनेक भागांत पडणार आहेत.
राज्यातील अनेक जिल्ह्यांत विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे.पुण्यातील घाटमाथ्यांपासून ते कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, अकोला, अमरावती आणि नागपूरपर्यंतच्या जिल्ह्यांमध्ये येत्या काही दिवसांत विजांचा कडकडाट होत पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
काही ठिकाणी वाऱ्याचा वेग 30-50 किमी प्रति तासपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पश्चिम घाटमाथ्यांवर, विशेषतः पुणे आणि सातारा जिल्ह्यांतल्या डोंगराळ भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला गेला आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंहगड, राजगड, महाबळेश्वर आणि भोर परिसरात वातावरण अतिशय निसर्गमय झालं आहे.
नाशिक, नाशिक घाटमाथा, धुळे, जळगाव, अहिल्या नगर या जिल्ह्यांमध्ये अंशतः ढगाळ आकाश आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
कोल्हापूर आणि सांगलीत विजेच्या गडगडाटासह मेघगर्जना होणार असून, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. हलक्या स्वरुपाचा पाऊस पडल्याने जमिनी भिजतील, मात्र अजूनही मोठ्या सरींची वाट पाहावी लागणार आहे. लातूर, बीड, धारशिव जिल्ह्यांत हलक्या सरींचं पडणार आहेत. विदर्भातील अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूरसारख्या भागात देखील वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असून, तिथेही विजांसह पावसाचा अंदाज आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jun 05, 2025 6:47 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आजचं हवामान: सोसाट्याचा वारा अन् ढगांचा गडगडाट, 27 जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागाकडून अलर्ट







