आजचं हवामान: 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा धो-धो, 19 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने दिला अलर्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पावसाची सुरुवात झाली आहे. पुण्यात पावसाची उघडीप असून पुढील 24 तासात हलक्या पावसाची शक्यता आहे. राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पावसाने दोन दिवस उसंत घेतल्यानंतर पहाटेपासून जोर धरला आहे. मुंबईसह उपनगर, ठाणे, उपनगर आणि नवी मुंबईत पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, पालघर, ठाण्यात आज हलक्या स्वरुपाचा पाऊस राहील असा अंदाज आहे. तर तळ कोकण रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील काही भागांमध्ये यलो अलर्ट दिला आहे.
पुणे जिल्ह्यात सर्वच भागात पावसाने उघडीप घेतली आहे. मागील 24 तासात पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात शून्य मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. यावेळी कमाल तापमानाचा पारा 30.4 अंश सेल्सिअस होते. पुढील 24 तासात संपूर्ण पुणे जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 30 तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके राहील. पुढील 4 दिवसासाठी सातारा जिल्ह्यात सतर्कतेचा येलो अलर्ट दिला आहे.
advertisement
अहिल्यानगर, पुणे, घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 40 किमी वेगाने वारे वाहतील, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, नागपूर, बुलढाण्यात आज आणि उद्या दोन दिवस विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्यात पुन्हा दोन दिवस 19 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
advertisement
या हवामानामुळे बुरशीजन्य रोगांचा धोका वाढू शकतो, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. बीड, लातूर, संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव आणि जालना या जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. हवामानाशी संबंधित अधिकृत अपडेट्ससाठी नागरिकांनी IMD च्या अधिकृत संकेतस्थळावरून या संदर्भातील माहिती घेत राहावी.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 07, 2025 7:24 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आजचं हवामान: 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा धो-धो, 19 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने दिला अलर्ट