आजचं हवामान: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, 7 जिल्ह्यांसाठी धोक्याचा इशारा, हवामान विभागाने दिला अलर्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
भारताच्या विविध भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर राहील.
मुंबई: एक दोन नाही तर भारतात पाच ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. दुसरं जम्मू-काश्मीरच्या दिशेनं पुढे सरकत आहे. तिसरं उत्तर प्रदेशच्या पट्ट्यात आहे. चौथं पंजाब आणि पाचवे अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे तयार झाला आहे. यामुळे देशभरात या आठवडा अति मुसळधार पावसाचा राहणार आहे.
महाराष्ट्रात आज मुसळधार तर उद्यापासून पुढचे चार दिवस अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात 40-50 किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा देण्यात आला आहे. तर उद्यापासून पुढचे चार दिवस 7 जिल्ह्यांसाठी धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
कोकण पट्ट्यात कसं असेल वातावरण?
मुंबई वगळता संपूर्ण कोकण पटट्यात आज हवामान विभागाने मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई आणि उपनगरात आज रिमझिम पावसाच्या सरी बरसतील. ठाणे, कल्याण डोंबिवली, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस राहील. 30-40 किमी वेगानं वारे वाहतील. उद्यापासून चार दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. समुद्रकिनाऱ्यावर जाऊ नये असं आवाहन केलं आहे. प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.
advertisement
उत्तर महाराष्ट्रात काय स्थिती?
धुळे नंदुरबार, जळगाव नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये आज आणि उद्या यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यानंतर हळूहळू पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. विकेण्डचा प्लॅन करणार असाल तर घराबाहेर पडताना तुम्हा हा हवामान विभागाचा अलर्ट नक्की वाचायला हवा.
advertisement
पश्चिम महाराष्ट्रात काय स्थिती?
पुण्यात आजपासून चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा नाही, मात्र रिमझिम पाऊस असेल. घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापूर, घाटमाथा, सातारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस राहील. उर्वरित ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहणार आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात काय स्थिती?
विदर्भ मराठावाड्यात पुढचे चार दिवस धोक्याचे आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 15, 2025 6:49 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आजचं हवामान: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, 7 जिल्ह्यांसाठी धोक्याचा इशारा, हवामान विभागाने दिला अलर्ट








