आजचं हवामान: बंगालच्या खाडीत जोरात फिरलं वारं, दक्षिणेकडून येतंय संकट, पुढचे 48 तास धोक्याचे

Last Updated:

आजचं हवामान: ऊन राहणार की पाऊस? मान्सून गेला पण अवकाळीचा धोका, बंगालच्या खाडीत पुन्हा चक्रीवादळ? दक्षिणेकडूनही धोक्याचा इशारा, पुढचे 48 तास धोक्याचे पाहा महाराष्ट्रावर काय होणार परिणाम

News18
News18
मुंबई: हवामान तज्ज्ञ डॉ. सुप्रित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातून मान्सूनने १० ऑक्टोबर रोजी पूर्ण एक्झिट घेतल्याचं अधिकृतपणे हवामान विभागाने जाहीर केलं. त्यामुळे आता ऑक्टोबर हिट वाढणार आहे. पश्चिम बंगाल आणि दक्षिणेकडे मात्र वाऱ्याची वेगानं हालचाल सुरू झाली आहे. पुन्हा एकदा वादळाचा धोका घोंगावत आहे. पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये आसामपासून ते तामिळनाडूपर्यंत प्रत्येक राज्याच्या समुद्रकिनाऱ्यावर सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती निर्माण झाली आहे.
चार सायक्लोनिक सर्क्युलेशनचा धोका
चार सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले आहेत. जे पुढच्या काही तासांमध्ये कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतरीत होऊ शकतात. वारं फिरण्याची शक्यता आहे. शक्ती चक्रीवादळ खोल समुद्रात पुढे सरकलं असून सध्या त्याचा कोणताही धोका नाही. मात्र त्याचे काही अवशेष किंवा परिणाम अजूनही दिसून येत आहेत.
पश्चिम विक्षोभ आणि मोठ्या प्रमाणात आर्द्रतेमुळे पावसाळी स्थिती पुन्हा सक्रिय झाली आहे. किनारपट्टीच्या भागांमध्ये १०० ते १५० मिमी पर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे. या नैसर्गिक बदलांमुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी आणि सुरक्षित स्थळी राहावे, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
महाराष्ट्रातून मान्सूनची एक्झिट
गुजरात आणि महाराष्ट्रातून मान्सूनने एक्झिट घेतली आहे. अलिबाग, अहिल्यानगरमधून मान्सून जाऊ शकतो. दक्षिणेकडे 10 ऑक्टोबर रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार अति मुसळधार पाऊस झाला. 11 ऑक्टोबर रोजी कर्नाटकसह इतर दक्षिण भारतातील राज्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मात्र दमट हवामान राहील.
या राज्यांमध्ये राहणार मुसळधार पाऊस
ईशान्य मान्सूनमुळे तामिळनाडू आणि अंतर्गत कर्नाटकमध्ये हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. याशिवाय, पुढील २४ तासांत आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिशा या राज्यांसोबतच नागालँड, मणिपूर आणि मिझोरामसारख्या ईशान्येकडील राज्यांमध्येही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
advertisement
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४८ तासांत सायक्लोनिक सर्क्युलेशन अधिक तीव्र होऊ शकते, ज्यामुळे ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस होईल. गेल्या २४ तासांत तामिळनाडू आणि दक्षिण किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला असून, हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
पुढचे चार दिवस कसं राहील वातावरण?
12 ते 14 ऑक्टोबर महाराष्ट्रात पाऊस नसेल. मात्र दक्षिणेकडे वारे वेगाने वाहतील आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 15 ऑक्टोबरपासून देशभरातून पावसाची एक्झिट होईल. त्यानंतर ऑक्टोबर हिटच्या झळा जाणवणार आहेत. तर यावेळी ला निनाचा इफेक्ट देखील राहणार आहे. त्यामुळे डिसेंबरकडे थंडी वाढण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आजचं हवामान: बंगालच्या खाडीत जोरात फिरलं वारं, दक्षिणेकडून येतंय संकट, पुढचे 48 तास धोक्याचे
Next Article
advertisement
Mumbai Mayor Reservation: अ, आ, इ, ई... आणि मुंबईचा गेम झाला! महापौर पदाच्या शर्यतीतून ओबीसी प्रवर्ग बाहेर पडण्याचं खरं कारण
अ, आ, इ, ई... अन् मुंबईचा गेम झाला! महापौर पदाच्या शर्यतीतून ओबीसी बाहेर का?
  • मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

  • महापौर आरक्षण सोडतीवर शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप घेतला होता.

  • ओबीसींसाठी मुंबईचं महापौर पदाचं आरक्षण का लागू झालं नाही, असा प्रश्न उपस्थित करण

View All
advertisement