Ahilya Nagar : पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय? मढी यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना बंदी, ग्रामसभेचा ठराव मंजूर
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Ahilya Nagar News : यात्रेला शेकडो वर्षाची परंपरा असून हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून यात्रेकडे पाहिले जाते. मात्र, या ऐक्यालाच तडा जाणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
साहेबराव कोकणे, प्रतिनिधी, अहिल्यानगर: सर्वांना सामावून घेणारा, प्रेम सद्भभावनेसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात मागील काही काळापासून धक्कादायक गोष्टी घडत असल्याचे समोर येत आहे. भटक्यांची पंढरी म्हणून राज्यभर ओळख असलेल्या मढीच्या कानिफनाथ महाराजांच्या यात्रेत यावर्षी मुस्लीम समाजाच्या व्यावसायिकांना बंदी घालण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला आहे. मार्च महिन्यामध्ये ही यात्रा भरते. यात्रेला शेकडो वर्षाची परंपरा असून हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून यात्रेकडे पाहिले जाते. मात्र, या ऐक्यालाच तडा जाणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
मढीच्या कानिफनाथ महाराजांची ही यात्रा होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत यात्रा सुरू असते. या यात्रेबाबत ग्रामसभा झाली. मढी यात्रेत मुस्लीम व्यावसायिकांना बंदी घालावी, अशी मागणी करणारी पत्रे विविध गावातून आल्याचे सरपंच तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय मरकड यांनी सभेत सांगितले. या पत्राची दखल घेत ग्रामसभेपुढे मरकड यांनी हा विषय मांडला. पारंपरिक पद्धतीनुसार देवाला महिनाभर अगोदर तेल लागलेले असते. असा कालावधी मढीच्या ग्रामस्थांच्या दृष्टीने दुखवट्याचा असतो. या काळात ग्रामस्थ तळणे, लग्नकार्य, शेतीकामे, प्रवास असे कार्य पूर्णपणे बंद करून घरामध्ये पलंग, गादीही वापरत नाहीत. महिनाभर कौटुंबिक सर्व कामे बंद ठेवून सर्व ग्रामस्थ नाथांच्या सेवेमध्ये स्वतःला झोकून देतात.
advertisement
हिंदूंच्या भावनांना ठेच...
मढी येथे येणारे व्यापारी परंपरा पाळत नाहीत. त्याशिवाय मटका, जुगार खेळले जातात. त्यामुळे हिंदूंच्या भावनांना ठेच बसल्यासारखे वातावरण झाले असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. कुंभमेळ्यात काही ठिकाणी मुस्लीम, व्यापाऱ्यांना बंदी केली. तशी मढी यात्रेत मुस्लीम व्यावसायिकांना बंदी करावी, अशी मागणी अनेकांनी केली आहे. त्यानुसार ग्रामसभेच्या ठरावात मुस्लीम व्यावसायिकांना मढी यात्रेमध्ये बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सरपंच मरकड यांनी सांगितले. ग्रामसभेतील ठरावावर आता प्रशासन कोणती भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले.
view commentsLocation :
Ahmadnagar (Ahmednagar),Ahmadnagar,Maharashtra
First Published :
February 23, 2025 8:20 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ahilya Nagar : पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय? मढी यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना बंदी, ग्रामसभेचा ठराव मंजूर


