'आमदार असलात म्हणून काय झालं...', निवडणुकीत घराबाहेर टोळक्याची दहशत, गाड्या फोडल्या, अहिल्यानगरमध्ये राडा
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
अहिल्यानगरमध्ये एका माजी आमदाराच्या घराबाहेर हल्लेखोरांनी कोयत्याने दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात हल्लेखोरांनी एका महिलेवर देखील हल्ला केला होता. यासोबत हल्लेखोरांनी कोयत्याने गाड्यांच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे.
Ahilyanagar News : साहेबराब कोकाने, प्रतिनिधी, अहिल्यानगर : राज्यात महानगरपालिका निवडणूक सूरू असताना अनेक ठिकाणी हत्याकांडाच्या किंवा हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटना ताज्या असताना तिकडे अहिल्यानगरमध्ये एका माजी आमदाराच्या घराबाहेर हल्लेखोरांनी कोयत्याने दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात हल्लेखोरांनी एका महिलेवर देखील हल्ला केला होता. यासोबत हल्लेखोरांनी कोयत्याने गाड्यांच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांकडून या घटनेचा तपास सूरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत येथे माजी आमदार विठ्ठलराव भैलुमे यांच्या निवासस्थानावर कोयता गँगने हल्ला करून दहशत माजवल्याची घटना घडली आहे. ही घटना 31 डिसेंबर 2025 च्या उशिरा रात्री घडली होती. या घटनेने परिसरात खळबळ माजली होती.
खरं तर काही तरूण थर्टी फर्स्टची पार्टी करत होते. या पार्टी दरम्यान त्याने खूप दारू प्यायली होती. या दारूच्या नशेत कोयते घेऊने ते माजी आमदार विठ्ठलराव भैलुमे यांच्या निवासस्थानावर बाहेर जमले होते. हे हल्लेखोर भैलुमे यांच्या निवासस्थानाबाहेर मोठमोठ्याने शिवीगाळ करत होते. तसेच 'माजी आमदार असले म्हणून काय झाले', 'माजी नगराध्यक्ष असल्या म्हणून काय झाले', 'बाहेर या'’ अशा धमक्या देत दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होते.
advertisement
हल्लेखोरांच्या या धमक्या पाहून कुणीही बाहेर आलं नाही.त्यानंतर शेवटी माजी नगराध्यक्ष प्रतिभा भैलुमे या कुटुंबासह बाहेर आल्या असता त्यांच्यावर थेट हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. कोयता त्यांच्या दिशेने फेकण्यात आला होता, पण वेळीच त्या वाकल्याने तो बाजूला पडला आणि त्या थोडक्यात बचावल्या होत्या. दरम्यान हल्लेखोर जिवावर उठल्याचे पाहून प्रतिभा भैलुमे आणि त्यांचं कुटुंब जीवाच्या भीतीने घरात पळून गेलं होतं. त्यानंतर हल्लेखोरांनी घराच्या दरवाज्यावर कोयत्याने वार केले होते. हल्लेखोर इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी भैलुमे यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजी आहे.
advertisement
तसेच या घटनेनंतर माजी आमदाराच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी घटनेचा अधिक तपास करायला सूरूवात केली आहे.
view commentsLocation :
Hingoli,Hingoli,Maharashtra
First Published :
Jan 01, 2026 6:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'आमदार असलात म्हणून काय झालं...', निवडणुकीत घराबाहेर टोळक्याची दहशत, गाड्या फोडल्या, अहिल्यानगरमध्ये राडा











