advertisement

कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना रंगेहात पकडलं, शिक्षणांना दणका, केंद्रप्रमुखांवर गुन्हे, शिक्षण क्षेत्रात खळबळ

Last Updated:

वाशिमच्या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून कॉपीला समर्थन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

सामूहिक कॉपी प्रकरण
सामूहिक कॉपी प्रकरण
वाशिम : राज्य शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी विशेष अभियान सुरू आहे. मात्र या अभियानाला विविध ठिकाणी हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे. मात्र वाशिममध्ये केलेल्या कारवाईने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
वाशिमच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने मानोरा तालुक्यातील शेंदुरजना आढो आणि रुई गोस्ता या दोन परीक्षा केंद्रांसह किन्ही राजा येथील परीक्षा केंद्रांवर धाड टाकत बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये कॉपी करणाऱ्या तब्बल २० विद्यार्थ्यांना रंगेहात पकडले. यासाठी दोषी असणाऱ्या ३ केंद्र प्रमुखांसह इतर ९ पर्यवेक्षक शिक्षकांवर आसेगाव आणि जऊळका पोलिस स्टेशनमध्ये गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या तक्रारी नंतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
advertisement
शेंदुरजना आढो येथील आप्पास्वामी कनिष्ठ महाविद्यालयाच्या मध्ये बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये दोन विद्यार्थी कॉपी करताना आढळून आलेत. तसेच रुई गोस्ता येथील वाघामाय देवी आदिवासी आश्रम शाळा या परीक्षा केंद्रावर एकूण १७ विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केली होती.
त्या प्रकरणी मानोरा पंचायत समितीचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी अनिल पवार यांनी तक्रार दिल्यावर केंद्र प्रमुख यांच्यासह एकूण ६ पर्यवेक्षक शिक्षकांवर आसेगांव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच किन्ही राजा येथील वसंतराव नाईक महाविद्यालय परीक्षा केंद्रावर इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये एका विद्यार्थ्याला कॉपी करताना पकडल्याने मालेगावचे गट शिक्षणाधिकारी गजानन परांडे यांनी जऊळका पोलिस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर केंद्र प्रमुख आणि इतर दोन पर्यवेक्षकांविरोधात जऊळका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
advertisement
या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून कॉपीला समर्थन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. वाशिम जिल्ह्यात झालेल्या कारवाईची चर्चा संपूर्ण राज्यात होत असून शिक्षक आणि केंद्रप्रमुखांना मोठा दणका दिल्याची चर्चा आहे.
राज्य शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी विशेष अभियान सुरू करण्यात आले. परंतु मराठवाडा-विदर्भात अनेक ठिकाणी सर्रास सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार दिसून येत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना रंगेहात पकडलं, शिक्षणांना दणका, केंद्रप्रमुखांवर गुन्हे, शिक्षण क्षेत्रात खळबळ
Next Article
advertisement
PAK vs NZ :  पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर होण्यावर शिक्काच मारला
पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर
  • पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर होणार

  • न्यूझीलंड विरूद्ध सामना पावसामुळे रद्द

  • पावसाने पाकिस्तानचा गेम केला

View All
advertisement