खेळता खेळता गायब झाला, विहिरीजवळ चप्पल सापडली, नंतर पाण्याचा उपसा करताच आईन फोडला हंबरलडा

Last Updated:

अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत घराच्या मोकळ्या जागेत खेळता खेळता एक चिमुरडा अचानक गायब झाला होता.

ahilyanagar shirdi news
ahilyanagar shirdi news
Ahilyanagar News : हरिश दिमोटे, प्रतिनिधी, शिर्डी / अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत घराच्या मोकळ्या जागेत खेळता खेळता एक चिमुरडा अचानक गायब झाला होता. गायब झाल्यानंतर त्याची एक चप्पल विहिरीजवळ पडली होती. ही चप्पल पाहूनच चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाल्याचा संशय होता. अखेर विहीर उपसल्यानंतर थेट मृतदेह बाहेर आला होता. अन्वय श्रीकांत वरपे असे या 4 वर्षीय चिमुकल्याने नाव होते. त्याच्या या अशा मृत्यूने आता वरपे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याचसोबत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डी नजिकच्या सावळीविहीर गावात ही घटना घडली आहे. या घटनेत श्रीकांत वरपे यांच्या घरामागील मोकळ्या जागेत त्यांचा 4 वर्षीय मुलगा अन्वय श्रीकांत वरपे हा खेळत होता. दरम्यान काही मिनिटे खेळता खेळता तो अचानक गायब झाला होता. दरम्यान खेळत असलेल्या आपल्या मुलाचा काहीच आवाज येत नसल्याने कुंटुंबियांनी त्यांची शोधाशोध सूरू केली होती. ही शोधाशोध करत असताना घराजवळील विहीरीच्या शेजारी एक चप्पल आढवली होती.ही चप्पल अन्वयचीच होती. त्यामुळे अन्वय विहिरीत पडल्यांचा संशय होता.
advertisement
कुटुंबिय आणि नातेवाईकांना अन्वय विहिरीतच पडल्याचा अंदाज आल्याने शिर्डी पोलिस आणि साई संस्थानच्या अग्निशमन पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.त्यानंतर विहिरीतील पाण्याचा उपसा करायला सूरूवात झाली होती. हा उपसा करत असताना तब्बल चार तास शोधमोहीम राबवण्यात आल्यानंतर अन्वयचा मृतदेह सापडला होता.त्यामुळे अन्वयचा विहिरीतच बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते.
दरम्यान या घटनेनंतर वरपे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. तसेच या घटनेने सावळीविहीर गावात हळहळ व्यक्त करण्यात आली होती. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
खेळता खेळता गायब झाला, विहिरीजवळ चप्पल सापडली, नंतर पाण्याचा उपसा करताच आईन फोडला हंबरलडा
Next Article
advertisement
'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पुरावा काय? मोठी अपडेट
गौरीने वडिलांना फोटो पाठवले, कुटुंबावर आभाळ कोसळलं! मेसेजमध्ये होतं काय?
  • 'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पु

  • 'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पु

  • 'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पु

View All
advertisement