Fofsandi Village: महाराष्ट्रातलं असं गाव जिथं अजूनही लोक गुहेत राहतात, 6 तासाचाच असतो दिवस!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Aishwarya Ramnath Taskar
Last Updated:
Fofsandi Village: महाराष्ट्रातील एका गावात सूर्य 2 तास उशिरा उगवते आणि 2 तास लवकर मावळतो. या गावाच्या नावाचा इतिहास देखील रंजक असाच आहे.
अहिल्यानगर: सह्याद्रीच्या डोंगररांगा हे महाराष्ट्राला लाभलेलं वरदान मानलं जातं. याच डोंगररांगात असं एक गाव आहे जिथं सूर्य दोन तास उशिरा उगावतो आणि दोन तास लवकर मावळतो. अहिल्यानगर जिल्ह्यातील डोंगररांगेत वसलेल्या फोफसंडी या गावचा दिवस हा फक्त 6 ते 7 तासाचा असतो. महाराष्ट्रातील सर्वात कमी सूर्यप्रकाश मिळणारं गाव म्हणून या गावाला ओळखलं जातं. याबाबद्दलच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
अहिल्यानगर जिल्ह्यातील फोफसंडी हे चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलं आहे. या गावात सूर्योदय दोन तास उशिरा होतो आणि सूर्यास्त दोन तास आधी होतो. त्याला गावाची भौगोलिक स्थिती कारणीभूत आहे. त्यामुळे राज्यातील सर्वात कमी सूर्यप्रकाश असणारं गाव म्हणून या गावाला ओळखलं जातं. या गावाच्या नावाचा इतिहास देखील रंजक आहे.
advertisement
फोफसंडी नावाचा इतिहास
भारतात ब्रिटिशांची राजवट होती तेव्हा फॉफ नावाचा एक इंग्रज अधिकारी सुट्टीच्या दिवशी म्हणजेच रविवारी विश्रांतीसाठी या निसर्गरम्य गावात जात असे. यावरूनच ‘फॉप संडे’ असं नाव पडलं. पुढे त्याच शब्दांचा अपभ्रंश होऊन फोफसंडी हे नाव पडलं.
फोफसंडी या गावाबद्दल
या गावाला निसर्गाचं वरदान लाभलं आहे. नदी, धबधबा हिरवाई डोंगर असल्याने गर्द हिरवी वनराई दुर्मिळ पशुपक्षी या गावात आढळतात. 1200 लोकसंख्या 12 वाड्या व 12 आडनावाचे लोक इथे राहतात. फोफसंडी या गावातील मुख्य व्यवसाय शेतीच आहे. इथे पावसाळ्यातील चार महिने शेती करतात. त्यात मुख्यतः भात, नागली, वरई ही पिके घेतली जातात.
advertisement
पावसाळ्यात अनेक पर्यटक या ठिकाणी फिरायला येतात. फोफसंडीचा धबधबा खूप लोकप्रिय आहे. अजूनही या गावातील लोक गुहेत राहतात. या गावात तुफान पाऊस पडतो. मांडवी नदीचा उगम फोफसंडी गावाच्या हद्दीतच होतो. तिथल्या एका गुहेत मांडव्य ऋषींनी तपश्चर्य केली होती. त्यांच्या नावावरूनच या नदीचे नाव मांडवी पडल्याचं सांगितलं जातं.
दरम्यान, चारही बाजूने डोंगराने वेढलेलं आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे गाव जणू धावपळीच्या जीवनातून मुक्त होऊन निसर्गात रमण्याचे ठिकाण आहे.
view commentsLocation :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
July 02, 2025 1:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Fofsandi Village: महाराष्ट्रातलं असं गाव जिथं अजूनही लोक गुहेत राहतात, 6 तासाचाच असतो दिवस!

