टिकली नका लावू, बुरखा घाला; शिक्षिकेचा धर्मांतराचा क्लास? अहमदनगरमध्ये धक्कादायक प्रकार
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
दोन शालेय अल्पवयीन मुलींच्या फिर्यादीवरून 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्तापर्यंत तीन मुलींनी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
हरीष दिमोटे,अहमदनगर/शिर्डी, 30 जुलै : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर,संगमनेर, कोपरगाव तालुक्यातील लव्हजिहादचे प्रकरण ताजे असतानाच राहुरी तालुक्यातील उंबरे गावात शालेय अल्पवयीन मुलींना धर्मांतराकडे ढकलण्यासाठी चक्क शिक्षिका काम करत असल्याचं समोर आलंय. या प्रकरणामुळे जिल्ह्यात लव्हजिहाद आणि धर्मांतर करण्यासाठी रॅकेट काम करतंय का ? असा प्रश्न निर्माण झालाय. दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून धर्मांतर करण्यास प्रवृत्त करणे आणी विननभंगाच्या तक्रारीनंतर राहुरी तालुक्यातील उंबरे गावातील सामाजिक वातावरण बिघडले होते.
परस्पर विरोधी तीन तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर प्रार्थना स्थळी दहशत निर्माण करणा-या जवळपास 13 आरोपींना जेरबंद केलंय.. मात्र हे प्रकरण आणखी गंभीर वळणावर आले असून कोचिंग क्लास घेण्याच्या माध्यमातून हिंदू मुलींचे धर्मान्तर करण्यास प्रवृत्त केलं जात असल्याची धक्कादायक माहीती समोर आलीय. या प्रकरणी अगोदर एक गुन्हा दाखल होता. आता आणखी दोन मुलींनी गुन्हा दाखल केला असून शिक्षिकेसह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे तर चार आरोपींना पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
advertisement
दोन अल्पवयीन मुलींनी समोर येत आम्हाला आम्हाला धर्म बदलण्यासाठी प्रवृत्त केलं जात असल्याचं म्हंटलय. तर बोगस अकाउंट बनवून फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली गेलीय..शिकवणीला जात असलेल्या ठिकाणच्या शेख या शिक्षिकेने आमची त्यांच्या समाजातील मुलांशी ओळख करून देत सेल्फी काढण्यास सांगितले असल्याची फिर्याद दिलीय. तर तुम्ही आमच्या समाजाच्या रितीप्रमाणे वागत जा, टिकली लावत जाऊ नका, बुरखा घालत जा अस वारंवार ही शिक्षिका सांगत असल्याचा आरोप मुलींनी केलाय. ओळख झालेल्या मुलांकडून सतत आम्हाला तू मला आवडतेस, माझ्याशी लग्न कर असे मेसेज येत होते व नकार दिल्यानंतर मेसेज व्हायरल करण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात देण्यात आलीय. फिर्यादी अल्पवयीन मुलीने घडलेली सगळी हकीकत बोलून दाखवलीय.
advertisement
राहुरी तालुक्यातील उंबरे हे छोटसं गाव आहे. सात हजार लोकसंख्या असलेल्या उंबरे गावात वीस ते पंचवीस मुस्लिम समाजाची घरे आहेत. अगदी एकोप्याने सर्व समाजातील लोक राहतात मात्र सलीम पठाण आणी हिना पठाण यांचे मात्र वेगळेच धंदे सुरू असल्याचं या प्रकरणामुळे समोर आलंय. विधान परिषदेत भाजप आमदार प्रसाद लाड यांनी या घटनेबाबत औचित्याचा मुद्दा सुद्धा उपस्थित केला होता. पहिल्या प्रकरणातील आरोपीचे नाव निष्पन्न झाल्यानंतर आता याच आरोपींनी अनेक मुलींची फसवणूक केली असल्याच समोर आलं आहे..
advertisement
दोन शालेय अल्पवयीन मुलींच्या फिर्यादीवरून 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्तापर्यंत तीन मुलींनी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने जिल्ह्यात धर्मांतर करण्याचे रॅकेट सूरु आहे का? असा सवाल माजी राज्यमंत्री शिवाजी कर्डीले यांनी उपस्थित केलाय.
हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली त्यांनी दबाव टाकल्यानंतर दोन अल्पवयीन मुलींच्या फिर्यादी नंतर 8 जणांविरुद्ध कलम 354, 354 ( ड ), 109 , 34 बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण अधिनियम सन 2012 चे कलम 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करम्यात आला असून शिक्षिकेसह 4 आरोपीना पोलिसांनी अटक केलीय.. हा सगळा प्रकार अनेक दिवसापासून सुरु असून केवळ लव्ह जिहादचा प्रकार असल्याने यापासून लक्ष दूर करण्यासाठी प्रार्थना स्थळाची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय.
advertisement
गेल्या अनेक दिवसापासून राज्यात लव्ह जिहादच्या अनेक घटना समोर येत असून आता राहुरी तालुक्यातील या घटनेने पुन्हा एकदा धर्मांतरनाचा मुद्दा समोर आलाय. नेमका हा सगळा प्रकार काय, यातील सत्य समोर आणण्याची जबाबदारी पोलिसांची असून पोलीस तपासात काय समोर येणार याकडं जिल्ह्याच लक्ष लागले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 30, 2023 12:20 PM IST
मराठी बातम्या/अहमदनगर/
टिकली नका लावू, बुरखा घाला; शिक्षिकेचा धर्मांतराचा क्लास? अहमदनगरमध्ये धक्कादायक प्रकार