Kukadi Water : कुकडीच्या पाण्यात असं शिजतं राजकारण! पुण्यातील 'या' नेत्यांपुढे नगरकर होतात हतबल

Last Updated:

Kukadi Water : कुकडी प्रकल्पाच्या पाण्यावरुन पुन्हा एकदा अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील राजकारण तापलं आहे.

कुकडीच्या पाण्यात असं शिजतं राजकारण!
कुकडीच्या पाण्यात असं शिजतं राजकारण!
अहमदनगर, 7 सप्टेंबर (साहेबराव कोकणे, प्रतिनिधी) : कुकडी प्रकल्पातील पावसाळ्यातही आवर्तनामुळे नगर जिल्ह्यात राजकीय गदारोळ सुरू आहे. तसा दरवर्षीच कुकडीच्या पाण्याला हा राजकीय तवंग येतो. यंदा जरा जास्तच आला आहे. कुकडीच्या पाण्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड या मतदारसंघात आरोप प्रत्यारोप जोरात सुरू आहे, कारण यावर्षी पावसाने ओढल्याने शेतकरी हवा दिला आहे, त्यातच पुढील काही दिवसात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे राजकारणाचा जोर या यावर्षी जरा जास्तच आहे.
अहमदनगर तीन पिढ्यांचं असलेलं हे राजकारण सध्या नगरमध्ये जोरात सुरू आहे. कुकडी प्रकल्पांतर्गत डिंबे, पिंपळगाव जोगे, वडज, येडगाव, माणिकडोह ही धरणे येतात. या सर्वांचा मिळून कुकडी प्रकल्प होतो. हा प्रकल्प पुणे जिल्ह्यात आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील नेते नेहमीच कुकडीचे पाणी आमचेच आहे. आम्हाला जेवढे तेवढे लागते तेवढे घेणारच. त्यानंतर उर्वरित पाण्याचे नियोजन कसे करायचे, हे तुमचे तुम्ही ठरवा. एकंदरीत अशीच त्यांची भूमिका असते. त्यात दिलीप वळसे पाटील, ही मंडळी अग्रेसर असतात. ही नेते मंडळी राष्ट्रवादीची आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच रडावर असते. मात्र, यावर्षी दुष्काळ असतानाही वेळेवर पाणी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची पिके जळून चालले आहे. कर्जत जामखेडचे विधानसभेचे आमदार राम शिंदे नेहमीच राजकारण करत असतात. मात्र, राजकारण हे जनतेच्या हितासाठी करायचं असतं स्वतःसाठी नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे,
advertisement
यावर्षी दुष्काळ जन्यस्थिती आहे. श्रीगोंदा तालुक्यातील 75 टक्के भाग हा कुकडी पाण्याच्या आवर्तनावरती अवलंबून असतो. आज या सगळ्या परिसरातील सर्वच पिके जळण्याच्या मार्गावर आहेत, आज जे पाणी सोडलं आहे ते पंधरा दिवस आधी सोडल्यास त्याचा पिकांना अधिक फायदा झाला असता. मात्र, श्रीगोंदा तालुक्याचे लोकप्रतिनिधी मीटिंगला उपस्थित नसतात तर वेळेवर शेतकऱ्यांची बाजू प्रखरपणे मांडत नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागत असल्याचा आरोप अनुराधा नागवडे यांनी केला आहे.
advertisement
कुकडी धरणामध्ये 33 टक्के पेक्षा जास्त पाणी असेल तरच आवर्तन सोडता येतं. त्यामुळे आतापर्यंत पाणी सोडलेलं नव्हतं. मात्र, शेतकऱ्यांची मागणी आणि पावसाने दिलेली ओढ पाहता अधिकाऱ्यांनी नियम बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी पाणी सोडले आहे. त्यामुळे मी अधिकाऱ्यांचे आणि सरकारचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली आहे,
advertisement
कुकडीच्या पाण्यावरून पुणे आणि नगर जिल्ह्यात नेहमी संघर्ष होत असतो. त्यातच अहमदनगरमध्ये कर्जत जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार हे राष्ट्रवादीचे असल्यामुळे त्यांना यापूर्वी धारेवर धरले जात होते, मात्र, यावेळी भाजपचे सरकार आहे तर श्रीगोंदा आणि कर्जत जामखेडमध्ये भाजपाचे आमदार आहेत. त्यामुळे श्रेयवादावरून आमदारांमध्ये चांगलाच राजकारण रंगले आहे. यांचं राजकारण होतच राहील मात्र शेतकऱ्यांच्या जीवनावर याचा परिणाम होऊ नये एवढीच अपेक्षा.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Kukadi Water : कुकडीच्या पाण्यात असं शिजतं राजकारण! पुण्यातील 'या' नेत्यांपुढे नगरकर होतात हतबल
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement