advertisement

Ajit Pawar Plane Crash: दोन कारणं अन् दादांसह 5 जणांचा जीव गेला, प्राथमिक अहवालातून धक्कादायक खुलासा

Last Updated:

बुधवारी २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्य विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला आहे. आता घटनेच्या ९ दिवसानंतर अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.

News18
News18
बुधवारी २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्य विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दादांसह इतर पाच जणांचाही जीव गेला आहे. अपघाताची बातमी समोर येताच संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. घटनेच्या दिवशी बारामती विमानतळ परिसरात दाट धुकं असल्याने हा अपघात झाला असावा, अशी माहिती सुरुवातीला समोर आली होती. याबाबत विविध संशयही व्यक्त करण्यात येत होते. आता घटनेच्या ९ दिवसानंतर अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार हे २८ जानेवारी रोजी बारामतीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी विमानाने जात होते. बारामतीत त्याच्या चार सभा होणार होत्या. यासाठी ते सकाळी मुंबईहून खासगी विमानाने बारामतीसाठी निघाले होते. मात्र, लँडिंग करताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातामध्ये अजितदादांसह ५ जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर डीजीसीएने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले. आता, या चौकशीतील प्राथमिक अहवाल समोर आला आहे.
advertisement
या अहवालात अजित पवारांच्या विमान अपघाताची दोन प्रमुख कारणं देण्यात आली आहेत. विमानातील तांत्रिक बिघाड आणि वैमानिकाचा चुकलेला अंदाज या दोन प्रमुख कारणांमुळे हा अपघात झाला असल्याचं प्राथमिक तपासात दिसून आलं आहे.

नेमकं काय घडलं? तपासातील महत्त्वाचे मुद्दे

तांत्रिक बिघाड (Technical Snag):

प्राथमिक अहवालानुसार, विमानाने लँडिंगसाठी धावपट्टीच्या दिशेने कूच केली असताना त्यात काही तांत्रिक बिघाड झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. विमानाची नियंत्रण प्रणाली किंवा इंजिनमध्ये शेवटच्या क्षणी उद्भवलेल्या समस्येमुळे विमान अस्थिर झालं होतं.
advertisement

वैमानिकाचा चुकलेला अंदाज

अहवालात नमूद केल्यानुसार, बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना वैमानिकाला धावपट्टीचा (Runway) अचूक अंदाज आला नाही. प्रतिकूल हवामान किंवा तांत्रिक अडचणींमुळे लँडिंगचा 'अँगल' चुकला, ज्यामुळे विमान धावपट्टीऐवजी बाजूला जाऊन आदळल्याचं म्हटलं जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar Plane Crash: दोन कारणं अन् दादांसह 5 जणांचा जीव गेला, प्राथमिक अहवालातून धक्कादायक खुलासा
Next Article
advertisement
Mumbai News: मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलिसांकडून अटक
मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलि
  • माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना

  • कांदिवली परिसरात एका मादी कुत्र्यावर लैंगिक अत्याचार

  • समता नगर पोलिसांनी एका नराधमाला अटक केली आहे.

View All
advertisement