फडणवीसांना कात्रजचा घाट दाखवला, १० मिनिटे शिल्लक असताना अजितदादांनी एबी फॉर्म दिला!

Last Updated:

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी अजित पवार यांनी नवाब मलिक यांना पक्षाचा एबी फॉर्म दिला.

अजित पवार-नवाब मलिक-देवेंद्र फडणवीस
अजित पवार-नवाब मलिक-देवेंद्र फडणवीस
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रचंड विरोध असतानाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना उमेदवारी दिली आहे. आपण उमेदवारी अर्ज भरणार आहोत असे मंगळवारी सकाळपासून नवाब मलिक सांगत होते. पक्षाच्या वतीने त्यांना एबी फॉर्मही देण्यात आला होता. परंतु पक्षाच्या आदेशानंतरच आपण उमेदवारी अर्ज भरा, अशा सूचना मलिक यांना देण्यात आल्या होत्या. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही मिनिटे शिल्लक असताना मलिक यांनी आपल्या अर्जाला पक्षाचा एबी फॉर्म जोडला. त्यामुळे नवाब मलिक आता महायुतीचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांना अखेरच्या क्षणांपर्यंत गाफील ठेवून अजित पवार यांनी त्यांना कात्रजचा घाट दाखवला, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
मलिक यांच्यावर देशद्रोहाचे आरोप करून त्यांना महायुतीत घेऊ नये, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहिले. आताही विधानसभेला मलिक यांना उमेदवारी देऊ नये, यासाठी भाजपच्या वतीने प्रचंड दबाव टाकण्यात आला. उमेदवारी निश्चित करण्याकरिता जागावाटपाच्या बहुतांश बैठकांमध्ये मलिक यांच्या नावाला भाजपने विरोध केला.
नवाब मलिक हे अल्पसंख्याक चेहरा असल्याने त्यांना उमेदवारी दिली नाही तर मुंबईसह महाराष्ट्रात चुकीचा संदेश जाईल, अशी अजित पवार यांना भीती होती. लोकसभेला अल्पसंख्याक समाजाने महायुतीला जोरदार दणका दिला होता. विधानसभेला अल्पसंख्याक समाजाचा संभाव्य फटका टाळण्यासाठी अजित पवार यांनी शक्कल लढवली. नवाब मलिक यांना उमेदवारी देणार आहोत, हे त्यांनी जाहीरपणे सांगणे सांगितले.
advertisement
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी त्यांनी नवाब मलिक यांना पक्षाचा एबी फॉर्म दिला. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपायच्या १० मिनिटे आधी तुम्ही नामांकन अर्जाला एबी फॉर्म जोडा, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या. मलिक यांनीही पक्षाच्या सूचनांचे यथायोग्य पालन केले. बरोबर २ वाजून ५५ मिनिटांनी त्यांनी नामांकन अर्जाला एबी फॉर्म जोडला. त्यामुळे नवाब मलिक आता शिवाजीनगर मानखुर्द विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार झाले आहेत.
advertisement
ज्या भाजपने आणि देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी मिळू नये म्हणून जंग जंग पछाडले, अजित पवार यांची कोंडी केली, बैठकांमध्ये मलिक यांच्या नावाला तीव्र विरोध केला, त्याच मलिकांना आता राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने महायुती म्हणून त्यांचा प्रचार करण्याची वेळ भाजप-सेना कार्यकर्त्यांवर आली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
फडणवीसांना कात्रजचा घाट दाखवला, १० मिनिटे शिल्लक असताना अजितदादांनी एबी फॉर्म दिला!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement