advertisement

रिपोर्ट समोर आला मात्र 'त्या' 14 सेकंदाच गूढ कायम, अजित पवारांच्या विमानासोबत नेमकं काय घडलं?

Last Updated:

रनवे दिसतोय म्हटल्यानंतर अवघ्या 14 सेकंदात विमान कोसळलं मात्र या 14 सेकंदात काय घडलं याचं गूढ अद्याप कायम आहे.

अजित पवार
अजित पवार
पुणे :   दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक चौकशी अहवाल समोर आला आहे. AAIB कडून हा प्राथमिक अहवाल जारी करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या प्राथमिक अहवालाची प्रतिक्षा होती. अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात तपास नेमका कुठपर्यंत आला? याबाबत सर्वांना प्रतिक्षा होती. अखेर AAIB कडून प्राथमिक चौकशी अहवाल जारी करण्यात आला आहे. या अहवालानुसार, खबार हवामान, पायाभूत सुविधांची कमतरता आणि ऑपरेशनल निर्णय यांच्या संयोगामुळे हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण या अपघाताची अंतिम कारणे हे CVR/FDR सविस्तर विश्लेषणानंतर स्पष्ट होईल, असं सांगण्यात आलं आहे. रनवे दिसतोय म्हटल्यानंतर अवघ्या 14 सेकंदात विमान कोसळलं मात्र या 14 सेकंदात काय घडलं याचं गूढ अद्याप कायम आहे.
रनवेची दृश्यमानता कमी होती, साधारणतः पाच किलोमीटर दृश्यमानता आवश्यक होती. दृश्यमानता 3 किलोमीटरपर्यंत असल्याची माहिती नियंत्रकाने कॉकपिटला कळवली. त्यावेळी विमानाने पुन्हा एक वळण घेतलं. त्यानंतर रनवे दिसतोय असं नियंत्रकाला सांगण्यात आलं. मग लँडिंग क्लिअरन्स देण्यात आला. त्यानंतर लँडिंगवेळी 'ओह शीट, ओह शीट' हे शब्द ऐकू आले. तसेच या विमानातील दोन्ही पायलटनी मद्यपान केलं नसल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.
advertisement

विमानातून शेवटी काय संवाद झाला?

DGCA ने दिलेल्या अहवालानुसार पायलट आणि बारामतीच्या एटीसीचा संवाद समोर आला आहे. सकाळी 8 वाजून 43 मिनिटांनी रनवे दिसत नसून तो दिसल्यावर कळवतो असे पायलट म्हणाला. त्यानंतर 28 सेकंदानंतर पायलटने एटीसीला रनवे दिसत असल्याचे सांगितले. 4 सेकंदात एटीसी वाऱ्याचा वेग शांत असून सुरक्षीतरित्या लॅण्डिंग करू शकता असा मेसेज देण्यात आला. मात्र अवघ्या 14 सेकंदात ओ शिट.. ओ शिट असा आवाज आला
advertisement

14 सेकंदात काय घडलं? 

इंजिन बिघाड, हवामानातील गंभीर परिस्थिती, विमानातील तांत्रिक बिघाड किंवा वैद्यकीय
आणीबाणी यासारख्या परिस्थितीमध्ये MAYDAY कॉल दिला जातो. मेडे कॉल हा शब्द विमान वाहतूक क्षेत्रात संकटाचा इशारा म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखला जातो. अत्यंत आपत्कालीन परिस्थितीत जिथे धोक्याची शक्यता वाटते, तिथे वैमानिक मेडे कॉल देतो. विमान वाहतुकीच्या क्षेत्रात मेडे कॉल हा तात्काळ गंभीर संकटाचा इशारा मानला जातो. DGCA ने दिलेल्या टाईमलाईनुसार 8.43. 59 पर्यंत सर्व व्यवस्थित होते. मात्र अवघ्या 14 सेकंदाच असं काय घडलं की वैमानिकाला मे डे हा कॉल देखील देता आला नाही, याच गूढ अद्याप कायम असून त्याचा तपास सुरू आहे.
advertisement
TimePilot / Aircraft CommunicationATC Response
08:43:27CALL YOU RUNWAY IN SIGHT VSK--
08:43:28--COPIED
08:43:55FIELD IN SIGHT VSK12
08:43:59--VSK WINDS CALM RUNWAY 11 CLEARED TO LAND
08:44:13OH ST OH ST...--
advertisement

दोन्ही पायलटचे ब्रेथ अॅनालायझर टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह

अपघाताच्या दिवशी दृश्यमानता 3 हजार मीटर इतकी होती आणि विमान झाडावर धडकल्यानंतर जमिनीवर कोसळल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्याचसोबत फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डरमधील डेटा डाऊनलोड करण्यात यश आलं असून, प्राप्त झालेल्या डेटाची पडताळणी सुरू असल्याचंही अहवालात म्हंटलंय. विशेष म्हणजे दोन्ही पायटलची अपघाताआधीची ब्रेथ अॅनालायझर टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचंही अहवालातून समोर आलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रिपोर्ट समोर आला मात्र 'त्या' 14 सेकंदाच गूढ कायम, अजित पवारांच्या विमानासोबत नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'; ट्रम्प यांनी केली जगातील सर्वात मोठी लष्करी घोडचूक
इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'
  • इराण म्हणजे व्हेनेझुएला नाही!

  • अमेरिकेने छेडला मधमाश्यांचा मोहोळ

  • डोनाल्ड ट्रम्प यांचा आत्मघातकी डाव

View All
advertisement