गणेश विसर्जनाला गेला अन् क्षणात होत्याचं झालं नव्हतं, अमरावतीच्या तरुणाचा करुण अंत

Last Updated:

अमरावती जिल्ह्यातील धामणगांव रेल्वे तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील वाघोली गावात एका तरुणाचा करुण अंत झाला आहे.

News18
News18
संजय शेंडे, प्रतिनिधी अमरावती: अमरावती जिल्ह्यातील धामणगांव रेल्वे तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील वाघोली गावात एका तरुणाचा करुण अंत झाला आहे. संबंधित तरुण गणेश विसर्जन करण्यासाठी नदीवर गेला होता. गणेश विसर्जन करत असताना संबंधित तरुणाचा मृत्यू झाला आहे.
करण चव्हाण असं मृत पावलेल्या २२ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो अमरावती जिल्ह्याच्या धामणगांव रेल्वे तालुक्यातील वाघोली येथील रहिवासी होता. गणपती विसर्जन करत असताना पाय घसरून तो नदीत पडला आणि यातच त्याचा मृत्यू झाला.
गणपती विसर्जनाच्या वेळी करणचा पाय घसरल्याने तो नदीच्या खोल पाण्यात पडला आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे तो त्यात वाहून गेला. घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी त्याला तत्काळ वाचवण्याचा प्रयत्न केला. पण पाण्याचा वेग अधिक असल्याने तो क्षणात दिसेनासा झाला. बराच वेळ शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील धनोडी येथील नदीपात्रात आढळला.
advertisement
पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. करणच्या आकस्मिक मृत्यूमुळे वाघोली परिसरात शोककळा पसरली आहे. ऐन गणेश विसर्जन करताना एका तरुणाचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जातेय. प्रशासनाने नागरिकांना गणपती विसर्जनाच्या वेळी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गणेश विसर्जनाला गेला अन् क्षणात होत्याचं झालं नव्हतं, अमरावतीच्या तरुणाचा करुण अंत
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement