Pune Gang War : पोलिसांनी धिंड काढली तरीही माज उतरला नाही! टिपू पठाण टोळी करत होती आंदेकर टोळीला मदत?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune Gang War Crime News : आठ जणांविरुद्ध मंगळवारी भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये दोन टिपू पठाण टोळीतील सदस्य होती.
Pune Vanraj Andekar Case : पुण्यातील नाना पेठ परिसरात शुक्रवारी सायंकाळी सर्वांना हादरवणारी घटना घडली. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला नाना पेठ परिसरात कृष्णा आंदेकर याने घेतला अन् पुण्यात मोठी खळबळ उडाली. मामा वनराज यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होत असतानाच त्यांच्या भाच्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने आता मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. फक्त 19 वर्षांचा आयुष कोमकर हा क्लासमधून घरी परत येत असताना त्याच्यावर फायरिंग झाली.
आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
आयुष कोमकर याला तीन गोळ्या मारल्याचं प्राथमिक माहितीनुसार समोर आलं होतं. अशातच वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या आंदेकर टोळीतील कृष्णा आंदेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याच्यासोबत आणखी आठ जणांविरुद्ध मंगळवारी भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये दोन टिपू पठाण टोळीतील सदस्य होती. त्यामुळे आता आंदेकर टोळीला पठाण टोळीने मदत केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
advertisement
दोघं टिपू पठाण टोळीचे सदस्य
तालीम आस मोहम्मद खान उर्फ आरिफ (वय 24, रा. लोणी काळभोर) आणि युनूस जलील खान (वय 24, रा. सय्यदनगर, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघं टिपू पठाण टोळीचे सदस्य आहेत. त्यामुळे टिपू पठाण टोळीने आंदेकर टोळीला मदत केल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये पिस्तुल देखील पठाण टोळीने पुरवल्याचं कळतंय. पोलीस या प्रकरणात अधिकची माहिती घेत आहे.
advertisement
काही दिवसांपूर्वी, हडपसर भागातील सय्यदनगर भागात दहशत माजविणारा गुंड टिपू पठाण याच्यासह साथीदारांची पोलिसांनी शनिवारी धिंड काढली. टिपू पठाण आणि साथीदाराविरुद्ध एका महिलेची जमीन बळकाविल्याप्रकरणी नुकताच काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
डीजेवर लावत आयुषला संपवलं
दरम्यान, टपका रे टपका एक और टपका, तीन मे से एक गया, दो ये मटका हे गाणे डीजेवर लावत नाना पेठेत गणेश कोमकरचा मुलगा गोविंद उर्फ गोविंद याची गोळ्या झाडून हत्या करण्यातचं देखील समोर येतंय. आयुषचे वडील गणेश कोमकर हा वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. सध्या तो तुरुंगात आहेत. तर आयुषची आई देखील भावाला मारल्याच्या प्रकरणात तुरूंगात आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 07, 2025 8:52 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Gang War : पोलिसांनी धिंड काढली तरीही माज उतरला नाही! टिपू पठाण टोळी करत होती आंदेकर टोळीला मदत?